शिरुर तालुक्यात कपड्याचे भले मोठे दुकान जळून खाक

मुख्य बातम्या शिरूर तालुका

दुकान खाक झाल्याने तब्बल एक कोटीचे नुकसानीच अंदाज

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरु येथील एस टी स्टँड समोर असलेले वामा फॅशन हे भलेमोठे कपड्याचे दुकान सकळच्या सुमारास जळून खाक होऊन तब्बल 1 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून नागरिकांसह अग्निशमक दलाच्या जवानांकडून आग विझवण्यात यश आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एस टी स्टँड समोरील शिवाजी धुमाळ हे पावणे 7 वाजता घराबाहेर आले असता वामा फॅशन या दुकानातून धूर येताना त्यांना दिसले. त्यांनी तातडीने शेजारील सुनील चौरसिया व आदींना आवाज दिला असता कपड्याच्या दुकानाला आग लागल्याचे दिसून आले.

दरम्यान दुकान चालकाला बोलावण्यात आले तर संतोष चौरसिया, सुनील चौरसिया, प्रदिप थोरात, सतीश सासवडे, समीर शेख, किरण चौरसिया, सचिन चौरसिया, दस्तगीर शेख, योगेश लोखंडे, शुभम चौरसिया, राजेश धुमाळ, पप्पू सासवडे यांसह आदींनी पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला तर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर, पोलीस हवालदार किशोर तेलंग, शिवाजी चीतारे, आत्माराम तळोले यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी आटोक्यात आणली तर पुणे महानगर विकास प्राधिकरणचे अग्नीशमक दलाचे केंद्र अधिकारी विजय महाजन, नितीन माने, फायरमन प्रशांत अडसूळ, मयूर गोसावी, अक्षय नेवसे, सचिन गवळी, संदीप तांबे, रांजणगाव औद्योगिक वसाहतच्या अग्निशमक दलाचे केंद्र अधिकारी महेंद्र माळी, मंगेश गावडे, सचिन पाटील, शुभम यादव यांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मात्र नागरिकांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली तर अग्निशमक दलाच्या दोन तुकड्यांनी देखील आग विझवत आग दुकान आग मुक्त केले. मात्र संपूर्ण दुकान आगीच्या भस्मस्थानी पडल्याने दुकानातील सर्व इलेक्ट्रिक साहित्य, सीसीटीव्ही तसेच सर्व कपडे जळून खाक झाल्याने दुकानाचे तब्बल दिड कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून आगीचे नेमके कारण समजू शकले नसून यामध्ये कोणतीही हानी झालेली नाही.