एक जानेवारीचा कार्यक्रम सुयोग्य नियोजनात पार पडेल; डॉ. राजेश देशमुख

मुख्य बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांकडून शिक्रापुरातील पार्किंगच्या जागेसह आदी पाहणी

शिक्रापूर (शेरखान शेख): एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या शौर्य दिनाची तयारी प्रसासनाने सुरु केलेली असून प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे 1 जानेवारी रोजी होणारा शौर्यदिनाचा कार्यक्रम शांततेत व सुयोग्य नियोजनात पार पडेल असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगली नंतर प्रशासनाने योग्य खबरदारी घेतलेली असताना प्रत्येक वर्षी प्रशासनाकडून या कार्यक्रमाची विशेष तयारी करण्यात येत असते. काही ठिकाणी स्वतंत्र पार्किंग करुन तेथे वाहने लावून स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात येत असताना या वर्षी मोठ्या प्रमाणात समाजबांधव येण्याची शक्यता असल्याने काही ठिकाणी पार्किंग देखील वाढवण्यात आलेले असताना शिक्रापूर येथील पार्किंगची नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पाहणी केली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांसह आदी अधिकारी उपस्थित होते.

याबाबत बोलताना एक जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात समाज बांधव विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. यावर्षीच्या 1 जानेवारीच्या कार्यक्रमाचे नियोजन आधी पासून सुरु केलेले असून पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, यांसह अनेक अधिकाऱ्यांच्या बैठका झालेल्या आहेत. या वर्षी मोठ्या प्रमाणात अनुयायी येण्याची शक्यता असल्याने पार्किंगच्या जागा वाढवण्यात आलेल्या आहेत. तसेच पिण्याचे पाणी, बसेस, आरोग्य विभाग यांच्या संख्या देखील वाढवण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण तसेच पोलीस आयुक्त पुणे शहर हे देखील याबाबत योग्य नियोजन करत आहेत. त्यामुळे यावर्षीचा देखील कार्यक्रम शांततेत व सुयोग्य नियोजनात पार पडेल असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.