रांजणगाव MIDC तील कंपनीत लाखों रुपयांची चोरी करणाऱ्या 4 जणांना अटक

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC तील वॉल्टर बैंक कंपनीच्या कंपाउंडच्या आत मध्ये असलेल्या 17 लाख 28 हजार 626 रुपये किंमतीचे वेगवेगळ्या मापाचे 85 फॉर्मिंग टुल, ईलेक्ट्रिकल केबल, वेल्डिंग मशिन, व पॅनल चोरुन नेल्याप्रकरणी जयराज करनन फ्लॅट नं सी-1 /603 JKJ पूर्वरंग सोसायटी, वाघोली, ता हवेली जि पुणे मुळ यांनी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

हा गुन्हा घडल्यानंतर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे यांना गुन्हा उघडकिस आणणे कामी योग्य त्या सुचना दिल्या. त्यानंतर तपास पथकातील दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, विजय शिंदे यांनी गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषण करुन सदरचा गुन्हा 1)राजेश फगु चौधरी (वय 30), 2) सुरेश विजय बाहदुर चौरसिया (वय 27), 3) संदिप कुमार राधेशाम चौरसिया (वय 22) 4) रविंद्र कुमार घनशाम चौरसिया (वय 20) या चार आरोपीनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्ह्याच्या कामी सदरच्या चार आरोपीना अटक करुन त्यांच्याकडुन चोरी झालेला सर्व माल जप्त करण्यात आला.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, रांजणगाव MIDC चे पोलीस निरिक्षक बलवंत मांडगे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, सहायक फौजदार गुलाब येळे, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे, विलास आंबेकर यांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे व गुलाब येळे हे करत आहेत.