विजय स्तंभासह वढुतही लोटला भीमसागर

मुख्य बातम्या

छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळांच्या समाधीचे दर्शन

शिक्रापुर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथिल ऐतिहासीक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणारे अनुयायी वढु बुद्रुक येथिल छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी येत असल्याने वढुतही मोठ्याप्रमाणावर भीमसागर लोटल्याचे चित्र दिसत होते.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे फाटा येथील ऐतिहासीक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी दिवसभराता लाखो भीमसैनिकांनी मानवंदना दिली. येथील मानवंदनेनंतर हे भीमसैनिक कोरेगाव भीमा येथे दाखल झाल्यानंतर येथुन पीएमपीएलच्या बस मधुन वढु येथे देखील जात होते.

वढु बुद्रूक येथे येत भीमसैनिकांनी छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीचे देखील दर्शन घेतले. शौर्यदिनाच्या पार्श्वभुमिवर सदर ठिकाणी असलेल्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली होती. तर छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ व गोविंद गोपाळ यांचे समाधीस्थळावर बॅरिगेटींग करण्यात आले होते.

वढुमध्ये (दि. 1) जानेवारी रोजी सकाळपासुनच दोन्ही समाधी स्थळावर अभिवादन व नतमस्तक होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भीमसैनिक उपस्थित होते. यामध्ये तरुणांसह महिलांचाही मोठा सहभाग असल्याचे दिसून येत होते पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सदर ठिकाणी देखील अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडला आहे.