शिरुर शहरातील हुडको कॉलनीतील सांस्कृतिक भवन समस्यांच्या विळख्यात…

मुख्य बातम्या

डागडुजी न करता नगर परिषदेकडून होतेय वसुली

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील हुडको वसाहतीमधील ओपन स्पेसमध्ये असलेली सांस्कृतिक भवन ही इमारात वास्तविक पाहता हुडकोवासींना कार्यक्रमांसाठी निशुल्क उपलब्ध असायला हवी होती. परंतु हुडको काॅलनीमधील नागरिकांना त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी सांस्कृतिक भवनामध्ये कार्यक्रम घेण्यासाठी शिरुर नगर परिषदेमध्ये जावुन १००० रु. (एक हजार रु.) एवढे शुल्क भरुन पावती फाडावी लागते.

सदर शुल्क रक्कम अदा करूणही या इमारतीचा मेंटेनंस माञ नगरपरीषदेकडुन होत नसल्याने या सांकृतिक भवनाची दुरावस्था झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वास्तविक पाहता या ईमारतीची दुरुस्ती आणि मेंटेनसची सर्वस्वी जबाबदारी ही शिरुर नगर परीषदेचीची आहे.

या सांस्कृतिक भवनासाठी असलेले टाॅयलेटची दुरअवस्था झालेली दिसुन येत आहे,या टॉयलेटचा वापर तेथील स्थानिक नागरीक त्यांच्या वस्तू ठेवण्यासाठी करत आहे. टॉयलेटचा दरवाजा ही तुटलेला आहे. तसेच तेथील हातपंपाची दुरावस्था झाल्याने कार्यक्रमाच्या वेळी नागरीकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे कार्यक्रमासाठी शुल्क भरुनही नागरिकांना तेथील भौतिक सुविधांचा अभाव असून नगर परीषदेच्या हलगर्जीपणामुळे सांस्कृतिक सभागृहाची वाट लागली आहे.

नक्की शुल्क आकारुन काय साध्य केले जाते याचा प्रश्न हुडको वासीयांना पडला आहे. तरी संबंधित नगर परिषदेने लवकरात लवकर या ईमारतीची व टाॅयलेट, हातपंप यांची दुरुस्ती व स्वच्छता करावी. नाहीतर येत्या १९ डिसेंबर रोजी नगर परीषरीदेला हुडकोवासीय क्रृती समीती संघटक शैलेश नानासाहेब जाधव, शिवसैनिक(ठाकरे गटाचे)अविनाश सुरेश घोगरे हे नगर परीषदेच्या निषेधार्थ पंचांग भेट देणार आहेत.