शिरुर तालुक्यात नराधम बापानेच केला अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; आरोपी बापाला अटक

क्राईम मुख्य बातम्या

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात कारेगाव येथे भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या एका पस्तीस वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या ११ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले असुन हा दुर्दैवी प्रकार मुलीने आपल्या १३ वर्षीय मोठ्या भावाला सांगितल्यानंतर उघडकिस आला. त्यानंतर मुलीच्या आईच्या मैत्रीणीने हा प्रकार रांजणगाव MIDC पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत या नराधम बापाला अटक केली आहे. तसेच आरोपी विरुद्ध पोस्को आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम येथील एक कुटुंब कारेगाव येथे उदरनिर्वाह करण्यासाठी आले होते. पिडीत मुलीचा बाप हा बाहेरख्याली असल्यामुळे तीन वर्षांपुर्वी आपल्या दोन मुलांना टाकुन त्याची पहिली बायको निघुन गेली. त्यानंतर बापाने काही दिवसांपुर्वी दुसऱ्या बाईशी अनैतिक संबंध ठेवले. परंतु आठ दिवसांपुर्वी आरोपी बापाच्या वागण्याला कंटाळून दुसरी बाईही घर सोडुन गेली.

 

त्यानंतर या नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या ११ वर्षीय मुलीसोबत वारंवार लैंगिक संबंध ठेवले. त्याच्या यातना सहन न झाल्याने मुलीने आपल्या १३ वर्षीय मोठया भावाला सांगितले. त्यानंतर त्याने शेजारील व्यक्तीच्या मोबाईल वरुन आपल्या सख्या आईला फोन करुन सगळी हकीगत सांगितली. त्यामुळे तिने कारेगाव येथील आपल्या मैत्रिणीला तातडीने फोन करुन हि गोष्ट सांगितली.

 

त्यानंतर तिच्या मैत्रिणीने लगेचच पीडित मुलीच्या घरी धाव घेतली आणि तिथली परिस्थिती पाहुन रांजणगाव MIDC पोलिसांशी संपर्क साधला. रांजणगाव पोलिसांनी आधी त्या पिडीत मुलीला ताब्यात घेऊन तिला वैद्यकीय उपचारासाठी आधी शिरुर आणि त्यानंतर पुणे येथील शासकीय रुग्णालयात नेले आणि घटनेचे गांभीर्य  ओळखत नराधम बापाच्या मुसक्या आवळल्या. या घटनेतील पिडीत मुलीची प्रकृती सध्या स्थिर असुन रांजणगाव पोलिसांनी नराधम बापाला पुणे येथील विशेष न्यायालयात हजर केले असता. न्यायालायने आरोपीला आठ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

कारेगाव येथील घटनास्थळी शिरुरचे पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी भेट दिली. तर सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, अभिमान कोळेकर, महिला पोलिस हवालदार विद्या बनकर यांच्या पथकाने हि कारवाई केली असुन या घटनेचा पुढील अधिक तपास रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक सविता काळे या करत आहेत.

पुणे-नगर महामार्गावर अनोळखी महीलेला अज्ञात वाहनाची धडक, मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान

शिरुर-तांदळी रस्त्यावर गुनाटजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

जांबुत; बिबट्याच्या हल्यात महिलेचा मृत्यू ग्रामस्थ आक्रमक, गाव बंद ठेवुन पदयात्रा काढत केला रास्ता रोको