shivajirao-adhalrao-patil

शिरूरमध्ये आढळराव पाटील यांचे तिकीट कन्फर्म? कट्टर विरोधकाची घरी जाऊन भेट…

मुख्य बातम्या राजकीय

शिरूर : शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आमदार दिलीप मोहिते यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. शिवाय, आढळराव पाटील आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूर लोकसभा लढणार असे निश्चित मानले जात आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लोकसभा निवडणुकांच्या तारखांकडे लागले असून, आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघ जोरदार चर्चेत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटातील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना खुद्द अजित पवार यांनी दिलेल्या आव्हानामुळे शिरूरची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी माजी खासदार आढळराव पाटील यंदा उत्सुक असल्याची चर्चा आहे. अशातच शिवसेनेतील अंतर्गत फुटीनंतर शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांची कास धरली. तेव्हापासूनच आगामी लोकसभेसाठी तिकीट मिळवण्यासाठी आढळराव यांच्याकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चाही मतदारसंघात सुरू आहेत. अशातच या चर्चांनी आता आणखी जोर धरला आहे, आढळराव पाटील आणि त्यांचे कट्टर विरोधक आमदार दिलीप मोहिते यांच्यातील भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. आढळराव अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूर लोकसभा लढणार असे निश्चित मानलं जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अशातच आढळरावांना तिकीट देण्याबाबत अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांनी विरोध दर्शवला होता. दिलीप मोहिते यांच्या विरोधामुळे आढळराव यांची लोकसभेची वाट खडतर होणार असल्याचेही सांगितले जात होते. अशातच माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शनिवारी (ता. ९) मोहिते यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि वैर संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या भेटीनंतर आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, यावर शिक्कामोर्तब होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा शिरूरमधून अमोल कोल्हे यांना लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार मानले जात आहेत. तर महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार असल्यानं आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करून घड्याळ चिन्हावर ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाला राष्ट्रावादीच्या आमदारांचा विरोध आहे. आढळराव यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यास या मतदारसंघात आढळराव यांच्या विरोधात अमोल कोल्हे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मंचरमध्ये शेतकरी मेळावा पार पडला. पण, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या गैरहजरीमुळे नाराजीनाट्याची चर्चा रंगली. महाविकास आघाडीचे सरकार असताना सर्वाधिक बिघाडी शिरूर लोकसभेत पाहायला मिळाली होती. शिवाजी आढळराव आणि दिलीप मोहिते यांच्यामधील संघर्ष तेंव्हा राज्याने पाहिला. अशा परिस्थितीत अजित पवार शिरूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढळराव यांचा पक्षप्रवेश घेणार आहेत. अमोल कोल्हेचा पराभव करण्यासाठी अजित पवार हे पाऊल टाकणार आहे. पण मोहिते यांना काय हे पचनी पडलेलं नाही,अशी चर्चा सर्वत्र रंगलेली. म्हणून अजित पवार यांच्या उपस्थित मोहिते यांच्या मतदारसंघालगत शेतकरी मेळावा पार पडला आणि मोहिते यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली.

दिलीप मोहिते म्हणाले, ‘कुटुंबातील लग्न असल्याने मी आजच्या सभेला आलो नाही. मी नाराज नाही. शिवाजी आढळराव आमच्या महायुतीत आहेत, त्यामुळं त्यांनी अजित दादांच्या गाडीतून प्रवास केला असेल.’

आढळराव पाटील आणि अजित पवार यांचा एकाच गाडीत प्रवास; चर्चांना उधाण…

अजित पवारांच्या टिकेनंतर अमोल कोल्हेंचा पलटवार, पक्षात येण्यासाठी लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या…?

शिरुरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टिका, तर अशोक पवारांबाबत सौम्य भुमिका

अमोल कोल्हे यांच्या सारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूक: अजित पवार

शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीबाबत म्हणाले…

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

अमोल कोल्हे यांचा कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून काढता पाय…

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…