बातमीचा दणका; पुणे-नगर महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवले

मुख्य बातम्या

कारेगाव (तेजस फडके): “कारेगाव येथे पुणे-नगर महामार्ग गेला खड्डयात” अशा आशयाची बातमी “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या बातमीची दखल घेत मुख्य चौकात असलेल्या या खड्डयात सिमेंट काँक्रेट टाकुन हे खड्डे बुजवले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त करत “शिरुर तालुका डॉट कॉम” चे आभार मानले आहेत.

शिरुर तालुक्यात जुलै महिन्याच्या सुरवातीलाच पाऊसाने दमदार हजेरी लावली. कारेगाव येथे मुख्य चौकातच मोठया प्रमाणात पाऊसाचे पाणी साठते. त्यामुळे पुणे-नगर महामार्गावर मोठया प्रमाणात मोठे मोठे खड्डे पडले होते. पाऊसाच्या पाण्यामुळे रात्रीच्या वेळेस खड्डयांचा अंदाज न आल्याने अनेक वाहनचालकांना किरकोळ दुखापत झाली होती. त्यामुळे या खड्डयांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनचालकांनी केली होती.

unique international school
unique international school

याबाबत सार्वजनिक बांधकाम प्रकल्प उपविभाग क्रमांक १ पुणे चे उपअभियंता राहुल कदम यांच्याशी संपर्क साधला असता “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना त्यांनी सांगितले की, कारेगाव येथे मुख्य चौकातच पुणे-नगर महामार्गावर दरवर्षी पाऊस पडल्यानंतर मोठया प्रमाणात पाऊसाचे पाणी साठत असल्यामुळे रस्त्याला खड्डे पडत होते. त्यामुळे कारेगाव येथे पुण्याकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजुने गटार लाईन करण्यात येणार असुन पाऊसाचे साठलेले पाणी या गटारलाईन मधुन थेट ओढ्यात सोडण्यात येणार आहे. या कामाचे टेंडर मंजुर झाले असुन येत्या आठ दिवसात हे काम सुरु करण्यात येईल.