Shirur taluka mukhyadhyapak sangh

शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाची निवड; पाहा नावे…

शिरूर तालुका

अध्यक्षपदी तुकाराम बेनके; सचिवपदी रामदास थिटे

शिक्रापूर : शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तुकाराम बेनके तर सचिवपदी रामदास थिटे यांची निवड करण्यात आली आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (ता. १५) श्री सिध्दीविनायक पब्लिक स्कूल येथे शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष यशवंत बेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर तालुक्याची कार्यकारिणी निवड करणेत आली.

शिरूर तालुक्यातील कार्यकारिणी पुढील प्रमाणे :
तुकाराम बेनके (अध्यक्ष)
रामदास थिटे (सचिव)
रतन गावडे – उपाध्यक्ष
तुकाराम शिरसाट – उपाध्यक्ष
बाळासाहेब चव्हाण – उपाध्यक्ष
यशवंत बेंद्रे – कार्याध्यक्ष
अशोकराव सरोदे – सहसचिव रामदास इथापे – सहसचिव
संजीव मांढरे – विद्या सचिव
अरुण गोरडे – विद्या सहसचिव
अविनाश क्षिरसागर – खजिनदार
भाऊसाहेब थोरात – सहखजिनदार
श्रीमती स्वाती थोरात – वार्ता संपादक
विशाल वाखारे – अंतर्गत हिशोब तपासणीस
श्रीमती. दिव्या जांभळकर – महिला प्रतिनिधी
श्रीमती. पल्लवी शानबाग महिला प्रति.
रामदास भोर – विनाअनुदान प्रति.
मोहन दरेकर – विनाअनुदान प्रति.
विकास शेळके. इंग्रजी माध्यम प्रति.
गौरव खुटाळ – इंग्रजी माध्यम प्रति.
आनिल शिंदे – विश्वस्त
बाबासाहेब गोरे – विश्वस्त
बापूसाहेब लगड – विश्वस्त
अप्पासाहेब कळमकर. विश्वस्त.

याप्रसंगी तालुक्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक व शिक्षणप्रेमी उपस्थित होते. निवडीनंतर नवनियुक्त पदाधि कारी यांचा सत्कार करणेत आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य रामदास थिटे यांनी केले. तुकाराम शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले तर तुकाराम बेनके यांनी आभार मानले.

शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात वैचारिक, सामाजीक, गुणवत्ता, प्रशासन यासाठी आदर्शवत कार्य सुरु ठेवणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, अर्धवेळ शिक्षक पदांस पूर्णवेळ मान्यता, प्रयोगशाळा सहाय्यक पदे, ग्रंथपाल पदे, शिक्षणावरील खर्चात वाढ होणेकामी प्रयत्न, जुनी पेंशन योजना मिळणेकामी शासनास आग्रह, कॅशलेस मेडिकल सुविधा आदि समस्यांबाबत प्रयत्नशील राहणार आहोत.
– रामदास थिटे, सचिव शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ