crime

शिक्रापुर मध्ये शेतीसह प्लॉटिंगमध्ये अफूच्या 1226 झाडांची लागवड केल्याप्रकरणी दोन जणांना अटक

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड लगत असलेल्या महालक्ष्मीनगर परीसरात शिक्रापुर पोलिसांच्या पथकाने एका शेतीसह प्लॉटिंगमध्ये छापा टाकून अफूची 1 हजार 226 झाडे जप्त केली आहेत. हि झाडे लावणाऱ्या सुशील शिवाजीराव ढमढेरे आणि सत्यभामा सुरेश थोरात या दोघांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

 

शिक्रापूर येथील तळेगाव रोड लगत असलेल्या महालक्ष्मी नगर परिसरात एका इसमाने शेतात तर एका महिलेने घराशेजारी प्लॉटिंगमध्ये अफूच्या झाडांची लागवड केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांना मिळाली. त्यांनतर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, पोलीस नाईक रोहिदास पारखे, किशोर शिवणकर, महिला पोलीस नाईक गिता बराटे यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सुशील ढमढेरे याने त्याच्या शेतातील लसूनच्या वाफ्यामध्ये काही अफूच्या झाडांची लागवड केल्याचे दिसले.

 

दरम्यान पोलिसांनी शिवाजी शिवाजीराव ढमढेरे (वय 38 वर्षे) यांनी शिक्रापूर येथील महालक्ष्मी नगर येथील गट नं 1263 येथे 66 अफूच्या रोपे त्यांचे वजन 7 किलो 294 किलो ग्रॅम तर 3 लाख 64 हजार 700 रुपये किंमतीच्या रोपांची लागवड केली होती. तर सत्यभामा सुरेश थोरात (वय 55 वर्षे) यांनी शिक्रापूर येथील महालक्ष्मी नगर येथील गट नं 1663 /1 मध्ये 1160 अफूची रोपे वजन 8 किलो 108 किलो ग्रॅम असून त्यांची 4 लाख 5 हजार 400 रुपये किंमत असुन त्यांच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुंगिकरक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान पोलिसांनी येथील अफूची 66 झाडे जप्त केली, त्यांनतर लगेचच येथील सत्यभामा थोरात यांच्या घराची पाहणी केली असता त्यांनी घराच्या शेजारीच प्लॉटिंगमध्ये तब्बल 1160 अफूच्या झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. दरम्यान पोलिसांनी सदर झाडे जप्त केली आहेत. याबाबत पोलीस निरीक्षक निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.