शिरुरच्या राणी कर्डीले, सविता बोरुडे, लता नाझिरकर यांना राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज (दि 24) रोजी कै.बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बेडकीहाळ, बेळगाव येथे कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील कन्नड व मराठी कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिरुरच्या रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, आधार छाया फाऊंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे यांना यशस्वी उद्योजिका, तर आदिशक्ती महिला मंडळाच्या सचिव लता नाझिरकर यांना उत्कृष्ठ सामाजिक कार्याबद्दल “राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार 2023” या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 

या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी उद्योजिका सुमित्रा पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. महिलांनो सक्षम व्हा, स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करा असे प्रतिपादन केले. यावेळी अनेक मान्यवरांनी स्वतः तयार केलेल्या कविता गायल्या. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचे 13 वे वशंज दिलीप नेवसे, कै.बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विक्रम शिंगाडे, अ‍ॅड प्रीती शिंगाडे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा फेटा तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.