sandeep kute

रांजणगाव MIDC तील जामिल स्टील कंपनीच्या विरोधात उद्या संदीप कुटे याचं आमरण उपोषण

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC मधील झामिल स्टील बिल्डींग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत वनविभागाच्या परवानगी शिवाय 40 ते 50 झाडांची कत्तल करण्यात आली असुन याबाबत मानव विकास परीषदेचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे यांनी 3 डिसेंबर 2022 आणि 19 डिसेंबर 2022 रोजी शिरुर येथील वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना याबाबत लेखी पत्र देऊनही कारवाई होत नसल्याने उद्या (दि 21) रोजी मानव विकास परीषदेच्या वतीने झामिल स्टील कंपनी समोरच मानव विकास परीषदेच्या वतीने आमरण उपोषण करणार असल्याचे संदीप कुटे यांनी सांगितले.

रांजणगाव MIDC त असलेल्या झामिल स्टील बिल्डींग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रशासनाने एक महिन्यापुर्वी वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता विविध प्रकारच्या 40 ते 50 झाडांची कत्तल केली. तसेच या झाडांच्या फांदया तसेच इतर लाकडांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. हि बाब रांजणगाव गणपती येथील मानव विकास परीषदेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी 3 डिसेंबर 2022 आणि 19 डिसेंबर 2022 या दिवशी शिरुर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी केली. परंतु त्यावर अद्याप पर्यंत कोणतीही दंडात्मक कारवाई न झाल्याने त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत संदीप कुटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, शिरुरचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, शिरुरचे तहसीलदार प्रशांत पिसाळ, रांजणगाव MIDC चे उपअभियंता मिलिंद कासार, रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांना पत्रव्यवहार केले असुन उद्या (दि 21) रोजी झामिल स्टील कंपनी समोर मानव विकास परीषदेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे आमरण उपोषण करणार आहेत.