शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील शाळेतील व कॉलेज मधील मुला मुलींना अश्लील वर्तन करण्याची मुभा देऊन त्यासाठी अवैध पार्टीशन टाकलेल्या ‘द स्टीम रुम कॅफे’ वर शिरुर पोलिसांनी साध्या वेशात ग्राहक म्हणून जाऊन छापा टाकून कॅफे चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
शिरुर शहरातील अशा कॅफेमधून इमारत मालकांना मोठ्या प्रमाणात भाडे मिळत असल्यामुळे ते अशा कॅफेना आपले गाळे भाड्याने देत आहेत. त्यांना याबाबत माहिती असुनही भाड्यापोटी त्याकडे दुर्लक्ष करत आहे अशा गाळेमालकांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे त्यामुळे गाळा भाड्याने देताना लोक विचार करतील.
याबाबत पोलिसांनी द स्टीम रुम कॅफेचे चालक ऋषिकेश रामदास ढवळे (वय २३) रा.ढवळगाव,ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई रवींद्र आव्हाड (ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर शहरातील वेगवेगळ्या कॅफे चालकांनी त्यांच्या हॉटेल व कॅफे मध्ये अवैध पार्टीशन केल्याने शाळेतील व कॉलेज मधील मुले मुली हे तिथे असभ्य व अश्लील वर्तन करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळाली होती.
त्यांनतर पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे, पोलीस हवालदार रवींद्र आव्हाड, महिला पोलीस कॉन्स्टेबल भाग्यश्री जाधव यांनी साध्या वेशात शहरातील द कॅफे स्टीम रूम येथे जाऊन नाष्टा ऑर्डर देऊन या मध्ये बसले असता त्यांना काही शालेय मुले मुली येऊन कॅफे चालकाने पार्टीशीयन केलेल्या रुममध्ये बसुन असभ्य व अश्लील कृत्य करताना दिसून आले, तर अजुनही काही शाळकरी मुले मुली देखील तेथे येत असल्याचे दिसुन आले.
याबाबत शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र आव्हाड (रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी कॅफे चालक ऋषिकेश रामदास ढवळे (रा.ढवळगाव ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार साबळे हे करत आहेत.
शिरुर तालुक्यातील अनाधिकृत सेंट चावरा स्कूलवर कारवाई करण्याची मागणी
धक्कादायक! शासनाची मान्यता नसतानाही सेंट चावरा स्कूल सुरु; पालकांची फसवणूक
शिरूर तालुक्यातील सेंट चावरा स्कूल विनापरवाना चालवल्याचे उघड