shivajirao adhalrao patil

शिरूर लोकसभा! शिवाजीराव आढळराव पाटील नरमले…

मुख्य बातम्या राजकीय

पुणे : शिरूर लोकसभेसाठी आग्रही असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तसे काम करणार असल्याची प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली आहे. यामुळे आढळराव पाटील नरमले असल्याची चर्चा रंगली आहे.

शिरूरच्या उमेदवारीवर बोलताना आढळराव पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी मला काम थांबवू नका असे सागितले आहे. पण जो पक्ष देईल तो आदेश मानणार, काम करणार. मी शिवसैनिक आहे, अर्थात धनुष्यबाणावर लढायला आवडेल. शिरूरमधून सुनेत्रा पवार किंवा वळसे पाटील उभा राहतील असं वाटत नाही. मी माझा जास्त वेळ माझ्या लोकसभा मतदारसंघात फिरत होतो, लोकांच्या अडचणी सोडवत फिरत होतो. आज म्हाडा अध्यक्षपद स्वीकारले आहे. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी टाकली. पण आपल्या सर्वांना वाटतं पत्ता कट झाला की काय? पण तसे काही नाही. मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याचं काम करणार. मला लोकसभा मिळाली नाही तरी चालेल, तिकीटासाठी कधीच मी फिरत नाही. अजित पवार आणि मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याचं काम आम्हाला काम करावं लागलं असं आढळराव पाटील म्हणाले. मी शिवसैनिक आहे, अर्थात धनुष्यबाणावर लढायला आवडेल’

अमोल कोल्हे अपयश झाकण्यासाठी बेंबीच्या देठापासून भाषण करत आहेत, असे सांगताना आढळराव पाटील म्हणाले की, ‘पाच वर्षात त्यांना काही जमलं नाही. मी मंजूर केलेली पाच बायपास रस्ते कामे माझीच आहेत. जो काम करत नाही ते क्रिडीट घेण्याच काम करत आहेत. बैलगाडा शर्यतसाठी मी काम केलं, त्यासाठी अनेकजणांनी आंदोलन केली आहेत. मी अमोल कोल्हे याच्यासारखे पक्ष बदलले नाहीत. अमोल कोल्हे यांनी अनेकदा पक्ष बदलले. ते नेते आहेत की अभिनेते त्याचे त्यांनाच माहिती. मी आहे त्याच शिवसेनेत आहे. मला लोकसभा मिळाली नाही तरी चालेल, तिकीटासाठी कधीच मी फिरत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तसे काम करणार.’

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूकीबाबत फोडली डरकाळी…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

मोठा गौप्यस्फोट! आढळराव पाटील शरद पवार यांच्या संपर्कात…

दिलीप वळसे पाटील आणि मी काही वैरी नाहीः आढळराव पाटील

राजकीय भूमिका लवकरच जाहीर करणार: आढळराव पाटील

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…