शिरुर तालुक्यातील “त्या” लग्नपत्रिकेची होतेय पुणे जिल्हयात चर्चा, प्रत्येक गावासाठी वेगवेगळी पत्रिका

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्याच्या बेट भागातील टाकळी हाजी गावचे माजी आदर्श सरपंच दामुशेठ घोडे तसेच पंचायत समिती सदस्या आणि विद्यमान सरपंच अरुणा घोडे यांच्या दोन मुलांचा शुभ विवाह येत्या ५ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे या लग्नाचे निमित्त शोधून त्यांनी नामी शक्कल लढवत शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परीषद गटामधील गांवागावांमध्ये या पत्रिकेच्या माध्यमातुन पोहचण्याच्या प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या लग्नपत्रिकेची शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात चर्चा होत आहे.

 

या लग्न सोहळ्यासाठी गावोगावी हजारो कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तसेच त्यांनी प्रत्येक गावाची वेगळी पत्रिका छापली आहे. त्या गावातल्या पत्रिकेत त्याच गावातील लोकांची नावे छापण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आधिकारी, पत्रकार अशी वेगवेगळया पदाधिकाऱ्यांची नावे असलेल्या पत्रिका त्यांनी छापल्या आहेत. त्यामुळे शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात या आगळ्यावेगळया लग्नपत्रिका चर्चेचा विषय ठरत आहेत.

 

तसेच प्रत्येक गावातील नागरीकांची नावे मिळवताना या कार्यकर्त्यांना अनेक रात्री जागून काढाव्या लागल्या आहेत. त्यांनी तब्बल वीस हजार पत्रिका छापून प्रत्येक गावागावात वितरीत केल्या आहेत. त्यामुळे दामूशेठ घोडे आणि अरुणा घोडे यांनी या विवाह सोहळ्यानिमित्त जिल्हा परिषद निवडणुकीची नांदीच सुरु केल्याची चर्चा गावोगावी नागरीकांकडून ऐकावयास मिळत आहे.

शिरुर तालुक्यात गावठी कट्टे आणण्यासाठी वाळू माफिया वापरत असलेल्या गाडीचा वापर..?नागरिकांमध्ये कुजबुज