शिरुरच्या नवनिर्वाचित पोलिस निरीक्षकांपुढे कायदा सुव्यस्था राखण्याचे मोठे आव्हान

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांची निवडणुक आयोगाच्या नियमावलीमुळे नुकतीच सहा महीन्याच्या बदली झाली. त्यांच्या जागी ज्योतीराम गुंजवटे यांनी नवनियुक्त पोलिस निरीक्षक म्हणुन पदभार स्वीकारला आहे.

 

त्यांनी यापुर्वीच २०१०ते २०११या कालावधी मध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणुण शिरुर पोलिस स्टेशनला काम केले होते. तब्बल बारा वर्षांनी त्यांची पुन्हा शिरुर पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षक म्हणुन नियुक्ती झाली आहे. यापुर्वी शिरुर पोलिस स्टेशन येथे काम केले असल्यामुळे गुंजवटे यांना शिरुरची बऱ्यापैकी माहीती आहे. याच माहीतीच्या जोरावर काम करणे त्यांना सोपे जाणार आहे.

शिरुर शहरातील बिघडलेली कायदा सुव्यव्यस्था, गुंडगिरी, गुन्हेगारी रोखण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. शिरुर शहरात बऱ्याचदा गोमांस विक्रीसाठी आणले जात आहे. गुन्हे दाखल होऊनही असे प्रकार वारंवार घडत आहे. तसेच दोन दिवसापुर्वी शिरूरच्या घोडनदीपात्रात अनोळखी मृतदेह दोरीने बांधलेल्या अवस्थेत सापडला होता. तो मृतदेह कोणाचा…? त्याचा खुन कसा झाला…? कोणी केला…? त्याचा तपास करणे त्यांच्या पुढे आव्हान निर्माण झाले आहे.

शिरुर तालुक्याच्या बेट भागात वर्षभरात अंदाजे शंभर विद्युत रोहीत्र, शेतकऱ्यांच्या विदयुत मोटारी, केबल चोरीला गेले आहे आणि ही नित्याचीच ठरलेली बाब आहे. या वारंवार होणाऱ्या विद्युत रोहीत्राच्या चोऱ्यांमुळे महावितरण दिवाळखोरीत निघणार आहे. तसेच शेतकऱ्यांचेही मोठे हाल होत आहेत. शिरूर शहरात मटका, जुगार, गुटखा, दारुविक्री, वेश्या व्यवसाय, बिंगो, गॅसचा काळाबाजार हे अवैध धंदे मोठया प्रमाणावर सुरु आहे. ग्रामीण भागातही अवैध धंदयांचा सुळसुळाट झाला असून त्यांना रोखण्याचे आव्हाण नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या पुढे उभे ठाकले आहे.

 

घोड धरणात रात्रीस वाळू उपशाचा चालतोय खेळ, प्रशासन सुस्त आणि वाळू चोर मस्त, कुणालाच कुणाचा लागेना मेळ