हिवाळ्यात सांधे आणि हाडांचे दुखणे

आरोग्य

बऱ्यापैकी थंडी पडण्यास सुरु वात झाली असून हिवाळ्यात सांधे व हाडांच्या दुखण्याबद्दल अनेकजण तक्रारी करतात. संधिवात असलेल्यांसाठी तर हा काळ खूप कठीण असतो. तापमानात घट होताच सांधे दुखू लागतात आणि हाडांमध्ये वेदना सुरू होतात.वृद्धांनाही उठताना-बसताना त्रास सहन करावा लागतो.मात्र,थंडीच्या दिवसांत काही उपाय केल्यास ते सांधेदुखीच्या रुग्णांना दिलासा देऊ शकतात.

हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ केल्याने आराम मिळेल

सांधेदुखीच्या रुग्णांनाही गरम पाण्याने मोठा दिलासा मिळतो. यामुळे सांधे व स्नायूंना खूप आराम मिळतो.एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या शरीराचे तापमान सामान्य होण्यास वेळ लागतो,त्यामुळे थंडीतून आल्या नंतर लगेचच गरम पाण्याने आंघोळ करण्याची चूक करू नका.शरीराचे तापमान थोडे सामान्य होऊ द्या.

मसाज-किमान आठवड्यातू न एकदा मसाज केल्याने वेदना कमी झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.मसाज केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

व्हिटॅमिन-डी-हिवाळ्यात व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे शरीर वेदनांबाबत अधिक संवेदनशील होते.व्हिटॅमिन-डी च्या कमतरतेमुळे ऑस्टिओपो रोसिसचाही धोका वाढतो.त्या मुळे हिवाळ्यात काही काळ सूर्यप्रकाशात जायला हवे. दिवसातून फक्त १५ मिनिटे सूर्यप्रकाश घेतल्याने शरीराला पुरेसे व्हिटॅमिन-डी मिळते.या साठी दूध /दुग्धजन्य पदार्थ, अंडी,मशरूम,फॅटी फिश यांचे सेवन करू शकता.

उबदार कपड्यांचा वापर करा-सांधेदुखीचा त्रास असले ल्या रुग्णांनी हिवाळ्यात विशेष काळजी घ्या.संपूर्ण शरीर उब दार कपड्यांनी उबदार ठेवल्या ने सांधेदुखी कमी होईल.पायात मोजे घाला.थंडीत अशी खबर दारी घेतल्याने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो.

भरपूर पाणी प्या-हिवाळ्यात तहान कमी लागते,परंतु,शरीरा ला नेहमीप्रमाणेच पाण्याची गरज असते.कोणत्याही ऋतूत शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नये.पाणी शरीराला हायड्रेट ठेवते,ज्यामुळे शरीर अधिक सक्रिय राहते.पाण्याऐ वजी ज्यूस,सूप / इतर पेयांनी शरीर हायड्रेट ठेवू शकता.

वजन नियंत्रणात ठेवा-लठ्ठ पणा/जास्त वजनामुळे लोक कमी सक्रिय व सुस्त होऊ शक तात.सांधेदुखीचा त्रास असले ल्यांनी वजन नेहमी नियंत्रणात ठेवा.गरज भासल्यास वजन कमी करण्यासही सुरुवात करावी.यासाठी वजन कमी करण्याचे प्रशिक्षण/विशेष आहाराची मदत घेऊ शकता. शरीराच्या वजनाचा संपूर्ण परिणाम सांधे आणि हाडांवर पडतो.त्यामुळे त्याबाबत गाफील राहू नका.

निरोगी आहार-हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह होतो, परंतु निरोगी आहार विसरू नका.निरोगी आहारामुळे सांधे निरोगी होतात आणि वेदना कमी होण्यास मदत होते आणि लक्षणे सुरु होण्याआधी ती कमी होण्यास मदत मिळेल.

(सोशल मीडियावरुन साभार)