यकृत निरोगी ठेवण्यासाठी ही 5 फळं आहेत गुणकारी; जाणून घ्या सर्व फायदे

आरोग्य

यकृत हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात मोठा भाग आहे, जो शरीरात एकाच वेळी अनेक कार्ये करतो. परंतु, यकृतामध्ये काही बिघाड झाल्यास शरीर पोषक घटक साठवणे, रक्तातील विषारी घटक काढून ते स्वच्छ करणे, ग्लुकोजचे ऊर्जेत रूपांतर करणे, शरीरातील प्रथिनांचे पोषण प्रमाण संतुलित करणे, यापासून ते चरबी आणि प्रथिने तयार करण्याची कामे करू शकत नाही. अन्नाचे पचन आणि रक्त गोठण्यासाठी आवश्यक प्रथिने तयार करण्याचे कामही ठप्प होऊ शकतं. म्हणूनच यकृत निरोगी राखण्यासाठी काही खास फळांचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे. यकृत निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी आपण कोणती फळ खावीत.

पपई:- पपई यकृतासाठी खूप फायदेशीर आहे. पपईमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे यकृताच्या (लिवर) सेल्सची सूज कमी करण्यास मदत करतात. यकृत निरोगी ठेवण्यासाठी पपईचा आहारात समावेश करावा.

द्राक्षे:- द्राक्षे यकृताच्या काही एन्झाईम्सला गती देण्यास आणि त्याचे कार्य सुधारण्यास मदत करतात. द्राक्षांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट यकृताच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच त्यामुळे यकृतातील सूज रोखण्यास मदत होते.

अंजीर:- अंजीरमध्ये असलेले काही आहारातील तंतू यकृताचे नुकसान टाळण्यास मदत करतात. यासोबतच अंजीरमध्ये उच्च प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट घटक असतात, जे फॅटी लिव्हरच्या समस्येपासून संरक्षण करण्यासाठी देखील काम करतात.

सफरचंद:- आपण आहारात सफरचंदाचाही समावेश करू शकता. हे यकृत डिटॉक्स करण्यास मदत करते. एवढेच नाही तर सफरचंदात असलेले पॉलिफेनॉल यकृतातील सीरम आणि लिपिड पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत करतात.

केळी:- केळी यकृत मजबूत करण्याचे काम करते. तसेच फॅटी लिव्हरची समस्या कमी होण्यास मदत होते. केळी खाल्ल्याने यकृत चांगले काम करते. त्यामुळे यकृत सुधारण्यासाठी तुम्ही केळी देखील खाऊ शकता.

(सोशल मीडियावरुन साभार)