आता काहीही किंमत मोजावी लागली तरी माघार घ्यायची नाही…

महाराष्ट्र

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांची बीड जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी सभा संपन्न झाली आहे या सभेमध्ये संबोधित करताना साहेब म्हणाले की आता वेळ आलेलेली आहे. चुकीच्या लोकांना आवरायचं आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. व्यासपीठावर आज काही लोक आहेत. ते आमच्याबरोबर राजकारणात नव्हते. पण काहीतरी मुद्दे काढून त्यांना तुरुंगात टाकले जाते. विशेषतः परळीत या गोष्टी अधिक होत आहेत. सत्तेचा गैरवापर करत लोकांना तुरुंगात डांबून कोणी वेगळं राजकारण करत असेल त्यांना उलथून टाकण्यासाठी कधीही वेळ लागणार नाही. ते करायला आमचे लोक तयार झाल्याशिवय राहणार नाहीत असे बीड येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमानी सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे.

शरद पवार साहेब पुढे बोलताना म्हणाले की बऱ्याच दिवसांनी आज बीडला संदीप क्षीरसागरांनी आयोजित केलेल्या सभेला उपस्थित राहता आले. तुम्ही लोकांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत पाहून मला जुन्या काळाची आठवण झाली. ती आठवण म्हणजे निष्ठेच्या बाबतीत बीड कधीही तडजोड करत नाहीत त्यांच्या पाठीशी जनता उभी राहते हे संदीप क्षीरसागर यांनी दाखवून दिले. असे शरद पवार साहेब यांनी यांचे कौतुकही यावेळी केले आहे. शरद पवार साहेब यावर सविस्तर बोलताना म्हणाले की महराष्ट्रात आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने काम करत होतो त्यावेळी खऱ्या नेतृत्वापेक्षा काही लोकांनी वेगळी भूमिका मांडायला सुरुवात केली. सामान्य जनता अस्वस्थ होते. त्यावेळी बीडचे नेतृत्व केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे होतं. त्यांनी भूमिका घेतली की,नेत्याच्या निष्ठेच्या संदर्भात मी तडजोड करणार नाही. त्याला जमेल ते करावं लागलं पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल. पण मी भूमिकेपासून मागे हटणार नाही अशी भूमिका केशरकाकूंनी घेतली होती. तीच स्थिती काकूंचे नातू संदीप क्षीरसागर यांनी आणली याचा मला आनंद आहे असेही शरद पवार साहेबांनी यावेळी स्पष्टपणे म्हटले आहे

शरद पवार साहेब पुढे बोलताना म्हणाले की, चमत्कारिक लोकांच्या हातात आज सत्ता आहे. कष्टकऱ्यांबाबत त्यांना आस्था नाही. समाजात फूट पाडण्याची त्यांची भूमिका आहे. आज देशात किती प्रश्न आहेत. महागाई, खताच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. शेतकरी आज अडचणीत आहे. पण सरकारला चिंता नाही. कायदा व सुव्यवस्थेची चिंता सरकारला नाही. मणिपूर, नागालॅंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची समस्या आहे. मणिपूरमध्ये समाजात गावांत भांडणं झाली. अनेकांच्या घरांवर हल्ले केले जात आहेत. स्त्रीयांची धिंड काढली जात आहे. पण भाजप सरकार कोणतेही पाऊल उचल नाही. देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूरला जाण्याची आवश्यकता होती. पण त्यांनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. अधिवेशनात अवघे तीन मिनिटे बोलले. पण पंतप्रधानांनी मणिपूरच्या भगिनींचे दुःख जाणून घेतले नाही असेही यावेळी बोलताना शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब म्हणाले की, लोकांनी निवडून दिलेली सरकारे पाडण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. स्थिर सरकार देण्याची घोषणा करता आणि केंद्रातील सत्तेच्या जोरावर विरोधकांची सरकारं उलथवून टाकता. त्यातून सामान्य जनतेचे जीवन उद्‌ध्वस्त केली जात आहेत. ज्यांना आपण सत्ता दिली ते लोक योग्य पद्धतीने वागत नाहीत. ठाण्यातील सरकारी रुग्णालयात १८ लोकांचे जीव गेले. जखमींना आधार देण्याची जबाबदारी रुग्णालयांवर असताना त्याच रुग्णालयांत लोक मृत्युमुखी पडतात. त्याबाबत राज्य सरकार बघ्याचे भूमिका घेते हे राज्य कसे चालेले आहे आणि कुठे चालेले आहे. हे आपण सर्वजण बघत आहोत. सध्या देशात बसलेल्या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काही घेणंदेणं नाही. सध्याच्या घडीला न परवडणारी स्थिती ही शेतीची झाली आहे. कष्टकरी, मजूर, कामगार हा सगळा वर्ग अडचणीत आहे आणि या केंद्र सरकारला त्याविषयीची चिंता नाही. मणिपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी का गेले नाहीत? असा प्रश्नही विचारला आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी केंद्र सरकारची असते. आज मणिपूरची अवस्था काय आहे? मणिपूर, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश ही छोटी राज्यं आहेत पण ही महत्त्वाची राज्यं आहेत. प्रत्येक राज्याच्या शेजारी पाकिस्तान तरी आहे किंवा चीन तरी आहे. या दोन्ही देशांची नजर चांगली नाही. संकट आलं तर काय होईल तिथून काय होईल यासाठी भारतीय लष्कराला सतर्क रहावं लागतं. मणिपूर हे सध्या अशांत आहे. आज मणिपूर पेटलं आहे. समाजा समाजात भांडण झालं अंतर पडलं. एक वर्ग विरुद्ध दुसरा वर्ग असा तिढा निर्माण झाला. तिथे हल्ले होत आहेत उद्योग नष्ट केले जात आहेत. स्त्रियांची धिंड काढली जाते आहे. हे सगळं होत असताना देशात बसलेलं भाजपाचं सरकार कुठल्याच प्रकारची पावलं टाकत नाही असेही शरद पवार साहेब यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

मणिपूरमधल्या भगिनींची दुर्दशा झाल्यानंतर आणि त्यांची घरदारं पेटवल्यानंतरही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथल्या समाजातल्या लोकांना दिलासा देण्यासाठी मणिपूरला जाणं आवश्यक होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही. संसदेचं अधिवेशन सुरु झालं तेव्हा फक्त तीन मिनिटं ते मणिपूरवर ते बोलले. अविश्वास ठराव आल्यानंतर चार ते पाच मिनिटं बोलले. मात्र तिथल्या भगिनींचं दुःख हे देशाच्या पंतप्रधानांनी समजून घेतलं नाही. आज ही स्थिती अनेक ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळते. ही स्थिती बदलायची असेल तर वेगळा विचार करावा लागेल असेही शरद पवार साहेब यांनी बीडमधल्या सभेत बोलताना म्हटले आहे. शरद पवार साहेब बीडमध्ये दाखल झाले तेव्हा जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. तसंच शरद पवार साहेब हे जेव्हा स्टेजवर आले तेव्हा देश का नेता कैसा हो? शरद पवार जैसा हो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार या घोषणा देण्यात आल्या. बीडमधल्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने शरद पवार साहेब यांचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांची अजित पवार गटाते नेते आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये सभा होत आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार फौजिया खान, आमदार रोहित पवार, आमदार अनिल देशमुख, आमदार राजेश टोपे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, सुनील भुसारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे, आमदार संदीप क्षीरसागर हे नेते उपस्थित होते.

महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकला नाही; जयंत पाटील

जेव्हा देशात दिल्लीश्वरांचे राज्य होते तेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने मराठी भूमीला स्वाभिमानाची जाणीव करून दिली. त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनीही आपल्या पित्याच्या स्वाभिमानाची परंपरा पुढे चालवली. महाराष्ट्र दिल्ली समोर कधीच झुकला नाही असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या स्वाभिमान सभेत बोलताना म्हणाले आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी सुडाचे राजकारण नाही तर प्रेमाचे राजकारण केले. यामुळे आजही ते जनमानसात जिवंत आहेत; पण आज अनेकजण राजकीय स्वार्थापोटी सुडाचे राजकारण करत समाजात वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असा आराेपही त्‍यांनी केला. राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरूगांत गेले. त्‍यांनी सुडाच्या राजकारणाविरोधी लढत देशातील युवकांपुढे वेगळा आदर्श घालून दिला आहे असेही जयंत पाटील यांनी म्हटले. धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये शरद पवार यांच्या स्वागतासाठी पोस्टर्स लावले. त्यांना आजही शरद पवारांच्या आशिर्वादाची गरज असल्याचे ऐकूण बरे वाटले असेही यावेळी बोलताना म्हटले.

सभेच्या वेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तथा नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की जे गेले ते बरेच झाले. कभी कभी सैलाब आता है और सबकुछ बदल देता है तसाच आताही सैलाब आला आणि आमचा संदीप क्षीरसागर नेता झाला. नाहीतर तो तरी कधी नेता म्हणून पुढे आला असता. चांगल्या चांगल्यांना आपण आजपर्यंत छातीवर घेतले आहे. आले अंगावर घेतले शिंगावर हा शरद पवारांचा नियम आहे. आणि आपण सर्व त्यांचे चेले आहोत. डरेंगे नाही तर लढेंगे. हा सगळा धनशक्ती विरोधात जनशक्तीचा मेळावा आहे. साहेबांचाच फोटो वापरायचा, आणि साहेबाच्याच नावाने दिशाभूल करायची अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. आता तुम्ही नाद केला आहे. अऱे संदीप तुझी आजी आज आकाशातून , प्रेमाने आनंदाने बघत असेल. कारण मला तुझ्याकडून बघून ही अपेक्षा नव्हती. पण तो ज्यावेळी खात्रीने सांगायचा की, साहेब, तुम्ही येऊन बघा, काय करतोय ते एकदा येऊन बघा. पण हा भगवानबाबाचा, वंजारीसमाजाचा पोरगा तुला शब्द देतो की, बीडच्या लढाईत तु्झ्या खांदाला खांदा लावून लढेन. बबन गिते, शंकर बांगर आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहेत. हा बीड जिल्हा आपण पुन्हा हलवून टाकू हा साहेबांना शब्द देतो. साहेबांना डिस्टर्ब करण्यासाठी, त्यांची राष्ट्रीय प्रतिमा मलीन करण्यासाठी केले जात आहे असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

संदीप क्षीरसागर म्हणाले की, काय भाषणं करायची. मोठ्या व्यासापीठावर आम्ही कधी भाषणं केली नाहीत आम्ही फक्त भाषणं बघायचो. काय हातवारे करायचे, असा असा मी नाव कोणाचं घेतलं नाही. तुम्ही म्हणाल नाव घेतलं म्हणून. कोणाचाही नाद करा पण साहेबांचा नाद करायचा नाय असे एका भाषणात धनंजय मुंडे म्हणाले होते. मुंडे यांच्याच शैलीत संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांच्या समक्ष वरील वाक्य बोलून दाखवले. त्यावेळी उपस्थितीतून एकच जल्लोष झाला. सोडून जाणारे नेते पूर्वी कशी भाषणे करायची काय म्हणायची याची आठवण संदीप क्षीरसागर यांनी करुन दिली. मात्र कोणी कोठेही गेले तरी जनता शरद पवारांसोबतच असल्याचे संदीप क्षीरसागर म्हणाले. ही मंडळी जेव्हा लोकांत जाईल तेव्हा लोक त्यांना जागा दाखवून देतील असा संदीप क्षीरसागर यांनी बोलताना म्हटले. काही लोक आम्हाला म्हणाले की आम्ही सत्तेत आहेात. आमच्यासोबत मोदी आहेत तुमच्याकडे काय आहे. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे साहेब आहेत. बीड आणि मराठवाड्याची जनता स्वभिमानी आहे. आयुष्यभर साहेब तुमच्यासोबत, तुमच्या विचारांसोबत राहील असेही क्षीरसागार यांनी म्हटले आहे.

यावेळी सभेला संबोधित करताना रोहित पवार म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब ज्या विचारासाठी लढत आहे. आपला महाराष्ट्र धर्माचा विचार फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राचा अस्मितेसाठी युवकांनी हे आव्हान करायचे आहे. पवार साहेब या वयामध्ये सुद्धा तुमच्या आमच्या सर्वांसाठी या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत आहे. एका बाजूला सत्ता आहे आणि एका बाजूला विचार आहे आम्ही सर्वजण विचाराबरोबर राहिलो आहे. सर्वांना माहिती आहे का आम्हा सर्वांना करावा लागणार आहे. आपण मोठ्या शक्तीच्या विरोधात म्हणजे भाजपच्या विरोधात लढत आहोत उद्या जाऊन कदाचित आमच्यावर कारवाई पण केली जाईल. कोणाला काहीही केले तरी आम्ही साहेबांना सोडणार नाही असा शब्द आहे देतो. लहानपणीपासून एकच गोष्ट आपण सर्वांनी लहानपणीपासून एकच म्हणजे महाराष्ट्रातला सह्याद्री दिल्ली समोर कधीही झुकत नाही. असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.