Eknath Shinde

मोठी घोषणा! एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री…

महाराष्ट्र मुख्य बातम्या

मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवारः पत्रकार परिषद घेवून केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘शिवसेनेचे आमदार आमच्यासोबत आले आहेत. अजून काही नेते येत आहेत. सगळ्यांचे पत्र आज आम्ही राज्यपालांना दिले आहे. भाजपने निर्णय घेतलाय की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही. मुख्यमंत्रीपदाकरता आम्ही काम करत नाही. ही तत्त्वांची लढाई आहे. ही हिंदुत्वाची लढाई आहे. ही विचारांची लढाई आहे. म्हणून भाजपने निर्णय घेतलाय की, एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचा शपथविधी होईल. लवकरच आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. यामध्ये शिवसेना आणि भाजपचे आमदार येतील. मी स्वत: बाहेर असेन, पण हे सरकार चालले पाहिजे ही जबाबदारी माझी असेल.’

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईत आद दाखल झाले आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राजभवनावर दाखल झाले. यावेळी फडणवीस आणि शिंदे सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी मोठी घोषणा करण्यात आली.