सिंधुदुर्गातील कुंब्रल गावचे सुपुत्र विजय सावंत ज्योतीबा फुले पुरस्काराने सन्मानित…

महाराष्ट्र

मुंबई: गिरनार व मुंबई साहित्य संघाच्या नाट्यगृहात एकता कल्चरल अकादमीच्या वतीने मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात अकादमीच्या वतीने नागेश मोरवेकर, कवी अजय कांडर,अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या हस्ते, नाट्यकर्मी प्रमोद पवार, हिंदी साहित्यिक डाॅक्टर रमेश यादव, समाजसेवक अनील देसाई यांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात आला.

एकता कल्चरल अकादमी सामाजिक, कला, वैद्यकीय सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात गेली 34 पेक्षा जास्त वर्ष कार्यरत असून दरवर्षी राज्यातील आपापल्या क्षेत्रात भरीव कार्य करणा-या व्यक्तिस सदर पुरस्कार दिला जातो. यावर्षीच्या निवड समितीने विजय सावंत यांचे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेली 15 वर्षे शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, एनजीओ, पालक, सहकारी यांच्यामार्फत केलेले काम, रात्र शाळेतील शिक्षण अर्धवट राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी केलेले अध्यापनाचे काम व साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान व सामाजिक क्षेत्रातील त्यांचा वावर या सर्वाचाच विचार करून सदर सन्मानाने त्यांचा गौरव केला आहे.याबद्दल सर्व थरातून त्यांच कौतुक करण्यात येत आहे.