रांजणगावात आई वडिलांच्या हस्ते ‘जिम’ चं उदघाटन करत दिला सामाजिक संदेश

शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात प्रथमच ‘वर्ल्ड फिटनेस जि’ च्या माध्यमातून ‘बॉडी शो’

रांजणगाव गणपती: सध्या प्रत्येकजण स्वतःच्या व्यवसायाच उदघाटन एखादया प्रतिष्ठीत व्यक्ती किंवा राजकीय व्यक्तींच्या हस्ते करतात. परंतु शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील दिगंबर ज्ञानेश्वर फंड आणि त्यांच्या परीवाराने हा पायंडा मोडुन काढत स्वतःच्या आई-वडिलांच्या हस्ते “वर्ल्ड फिटनेस” या जिमच उदघाटन केलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरीर सौष्ठव प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महेंद्र चव्हाण (मिस्टर वर्ल्ड), अजिंक्य रेडेकर (मिस्टर इंडिया), तोसिफ मोमीन (मिस्टर इंडिया) आणि संदीप सावळे (मुंबई श्री) यांनी शरीरसौष्ठव प्रदर्शन करुन उपस्थितांची मने जिंकली.

टाकळी हाजी गटात होणार चौरंगी लढत?

या कार्यक्रमाच्या निमित्ताने रांजणगावातील सर्व माजी सैनिकांचा तसेच कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल “शिरुर तालुका डॉट कॉम” चे संपादक तेजस फडके, उपसंपादक किरण पिंगळे, पत्रकार अशोक भोरडे, संभाजी गोरडे, प्रमोद लांडे, रविंद्र खुडे, रांजणगावचे सरपंच सर्जेराव खेडकर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर-आंबेगाव विधानसभा अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर पाटील, पुणे जिल्हा भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पाचुंदकर पाटील, युवासेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, बेस्ट बिजनेसमन पुरस्कार २०२१ विजेते उद्योजक किरण शिंदे आणि डॉ. मदन नरवडे यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना मिस्टर वर्ल्ड महेंद्र चव्हाण म्हणाले, मी गेले २० वर्षे सातत्याने नियमित व्यायाम करीत असून तेच माझ्या यशाचे गमक आहे. व्यायामामुळे पदकाची कमाई करून आपल्याला देशसेवा करता येते. वर्ल्ड फिटनेस जिम अत्याधुनिक असून तिचा फायदा परीसरातील जिम प्रेमींनी घ्यावा. यावेळी उद्योजक संपत खेडकर, रामदास लांडे, महेश फंड, बापूसाहेब शिंदे, विक्रम पाचुंदकर, रविंद्र खुडे, तेजस फडके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रगतीशील शेतकरी नानासाहेब पाचुंदकर, हर्षद जाधव, निळोबा फंड, रविंद्र बत्ते, राहुल पवार, रघुनाथ फंड, जितेंद्र फंड, सुनिल पवार, नेताजी फंड, राजेश लांडे, प्रताप फंड, रामदास डफळ, संपत कुटे, रोहित वाजे, चंद्रकांत भोजने, सोपान आहेर, तुकाराम जाधव, माजी सैनिक, ग्रामस्थ व तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे आयोजन दिगंबर फंड, ईश्वर बत्ते, यज्ञेश शेळके, विशाल पाचुंदकर, योगेश फंड, दयानंद फंड आणि राहुल फंड यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास खेडकर यांनी तर आभार विवेकानंद फंड यांनी मानले.