सकाळीच पाऊस, वाहनांच्या रांगा मात्र, पोलीस रस्त्यावर

शिरूर तालुका

शिक्रापूरच्या कर्तव्यदक्ष पोलिसाच्या कामाची सर्वत्र चर्चा व कौतुक

शिक्रापूर: सकाळ सकाळ अचानकपणे संततधार पाऊस, पुणे नगर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना वाहतूक कोंडी सुरळीत करणे गरजेचे होते त्यामुळे एक पोलीस मात्र पावसाची पर्वा न करता भर पावसात वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम करत असल्याने पोलिसाचे कर्तव्य हे चर्चेचा विषय बनला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे सकाळ पासूनच संततधार पावसाची सुरवात झालेली, नेहमीप्रमाणे पुणे नगर महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या यावेळी वाहतूककोंडी सोडविणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झालेले असताना पोलीस हवालदार संदीप कारंडे हे त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी सदर ठिकाणी आले अन भर पावसात विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करुन घेतली. पावसाच्या धारा सुरुच राहिलया.

दरम्यान काही वेळाने वाहतूक सुरळीत झाली मात्र वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा तशाच होत्या यावेळी पोलिसाने भर पावसात उभे राहून वाहतूक नियमनाचे काम सुरु ठेवले. पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असताना अनेक जन रस्त्याने येता जाता पोलिसांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन करत असल्याचे चित्र दिसून आले. मात्र यावेळी या पावसातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने पावसामध्ये गाडीच्या खाली उतरु पोलिसांना त्यांच्या कार्याच्या शुभेच्छा दिल्या तर पोलिसांनी त्यांचे चोखपणे पार पडलेल्या कामाचे परिसरात कौतुक होत आहे.

कर्तव्य केलेच पाहिजे: संदीप कारंडे
पोलिसांना सन, उत्सव, ऊन, वारा, पाऊस याचे काहीही कारण नसते काहीही असले तरी आपले कर्तव्य पार पाडावेच लागते. त्यामुळे आम्ही आमचे कर्तव्य पार पाडत होतो असे पोलीस हवालदार संदीप कारंडे यांनी सांगितले.