हुमणी नियंत्रणसाठी प्रकाश सापळा ठरेल प्रवाही: जयवंत भगत

शिरूर तालुका

शिंदोडी: चिंचणी (ता.शिरुर) येथे कृषि विभागाच्या माध्यमातून हुमणी नियंत्रणसाठी प्रकाश सापळा लावुन भुंगेरे नष्ट करण्याची मोहीम जोरदार राबविली जात असुन सामुहिक पध्दतीने हुमणी नियंत्रणसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

ऊस क्षेत्रात हुमणी किडीचा प्रादुर्भाव होऊन ऊसाचे उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रकाश सापळा लावण्याचे आवाहन केले आहे. निर्वी येथील संजय बळवंत सोनवणे यांनी प्रतिसाद देत २५ बल्ब, २५ होल्डर आणि वायर शेतकऱ्यांना प्रकाश सापळा लावण्यासाठी मोफत दिले आहेत. तसेच अनेक शेतकरी स्वतः सापळा लावत आहे हि मोहीम शेतकऱ्यांनी हाती घेतली तरच हुमणीचा समुळ नाश होईल असे कृषी सहायक जयवंत भगत यांनी सांगितले.

चिंचणी येथे प्रकाश आबासाहेब पवार यांच्या प्रक्षेत्रात प्रकाश सापळा लावताना जयवंत भगत यांनी सर्व शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया तसेच हुमणीचे नियंत्रण करताना किडीची ओळख, भुंगा, अंडी, अळी आणि कोष या चार अवस्था असुन अळी अवस्था जमिनीवर ६ ते ८ महिने आढळून येते. तसेच या कालावधीत जास्त नुकसान ऊसाचे होत असते. तसेच नंतर कोष अवस्थेत २ ते ३ महिने हि किड जमीनीत वास्तव्यास राहुन वळवाच्या पावसानंतर भुंगेरे बाहेर येतात आणि पुन्हा अंडी घालून प्रादुर्भाव सुरु होतो आणि ऊसाचे नुकसान करतात याची माहीती दिली.