sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे पाटील यांना प्रतिक्रिया विचारताच घेतला काढता पाय…

मुलाखत राजकीय

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जुन्नरमध्ये जे बोलले त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही, अशी भूमिका मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आहे. मतदानावेळी सगळं स्पष्ट होईल, ज्यांनी वेगळी भूमिका घेतली त्यांना जनताच धडा शिकवेल. असे वक्तव्य शरद पवार यांनी रविवारी (ता. १) जुन्नरमध्ये केले होते. त्यावर प्रसार माध्यमांनी प्रतिक्रिया विचारल्यावर वळसे पाटील यांनी काढता पाय घेतल्याचे पाहायला मिळाले.

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आज (सोमवारी) खेड तालुक्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावरुन त्यांना प्रश्न विचारले. त्यावर बोलताना वळसे पाटील म्हणाले की, ‘पवार साहेबांचे वक्तव्य व्यवस्थित ऐका, ते जे बोलले त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही. एवढेच बोलून वळसे पाटील थांबले आणि त्यांनी त्यासंदर्भात अधिकचं बोलणे टाळले. तसेच, पुढे बोलताना तहसीलदार हे पद कंत्राटी पद्धतीनं भरणे योग्य नाही, पण अनेक विभागांमध्ये काही काळासाठी कंत्राटी पद्धतीने भरती होते, तिथं तातडीने गरज असते. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ते गरजेचे असते.’

जुन्नरमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले होते की, ‘ जे लोक भाजपसोबत गेले ते लोक राष्ट्रवादीचे असूच शकत नाही. कोणी भाजपबरोबर जायची भमिका घेऊन तडजोड करण्याचा विचार करत असेल, तर तो विचार आम्ही स्विकारणार नाही. त्यासोबतच मतदानपेटीतून मी आणि राष्ट्रवादी कोणाच्या मनात आहे, हे नक्कीच कळेल. मतदानावेळी सगळं स्पष्ट होईल, ज्यांनी वेगळी भूमिका घेतली त्यांना जनताच धडा शिकवेल.’

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या ताब्यात असलेल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठक घेतली. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती जरी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असली तरी या बाजार समितीत वळसे पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक देवदत्त निकम हे वळसे पाटील यांचा विरोध डावलून निवडून आले होते. शरद पवारांची कालची (रविवारी) बैठक आयोजित करण्यात निकम यांचा पुढाकार होता. दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता त्यामुळेच व्यक्त केली जात आहे. खासदार अमोल कोल्हे हे देखील यावेळेस उपस्थित होते.

दिलीप वळसे पाटील यांची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका अन् स्पष्टीकरण…

राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक कार्यकर्ते व पदाधिकारी शरद पवार साहेबांसोबत

भ्रष्टाचाराचे आरोप करून शरद पवारांची बदनामी आणि त्यांचा पक्ष फोडण्याचे पाप मोदीजींनीच केले…

‘ना टायर्ड हू ना रिटायर्ड हू’…! शरद पवार

वळसे-पाटील साहेब तुम्हाला काय कमी केले होतं? का पत्करली गुलामी…