भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शिरुर शहराध्यक्षपदी तुषार भदाणे

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्षपदी तुषार चंद्रकांत भदाणे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. यापूर्वी भदाणे यांनी मयुरेश मित्र मंडळ चिंचवड गावचे कार्याध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्याच माध्यमांतून शिरुर व रामलिंग या ठिकाणी त्यांनी युवक आणि ज्येष्ठ व्यक्तींना बरोबर घेऊन त्यांनी रामनवमी उत्सवाच्या माध्यमातून त्यांचे काम चालू होते. गेल्या 25 वर्षांपासुन त्यांना सामाजिक कार्याचा अनुभव असल्यामुळे त्यांच्यावर शिरुर शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

शिरुर शहर भाजपाचे अध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी तुषार भदाणे यांना नियुक्तीचे पत्र दिले. शिरुर-हवेली विधासभा निवडणुक प्रमुख प्रदीप कंद, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचर्णे, भाजपाचे शिरुर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, पुणे जिल्हा सरचिटणीस भगवान शेळके, दिनेश पडवळ, शरद पवार, शोभना पांचगे, कैलास सोनवणे, केशव लोखंडे, संजय काळे, अनिकेत थोरात, श्रीकांत घावटे, गणेश पाचर्णे, सनी जाधव, विजय नरके, सचिन मृत्याल, विवेक नझन, प्रविण काळे, केतन मल्लाव, अमोल लुनिया,साहील गुंजाळ, विकास वाळुंज, गणेश गवारे, सोनू काळे, अतुल गुप्ता, सुमित बागवे आदी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना भदाणे म्हणाले, माझ्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे‌. तसेच मी पूर्णपणे पक्ष बांधणीसाठी प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडेल अशी त्यांनी भावना व्यक्त केली. भारतीय जनता पार्टी शिरुर शहरांमध्ये युवकांची मोठी बांधणी करणार असून येत्या काळात पक्षाला याचा फायदा होईल असे त्यांनी सांगितले. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना समाजातील तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करणार असल्याचे तसेच लोकांची विविध कामे आणि प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी यापुढील काळात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.