शिंदोडी येथे वादळी वाऱ्याने दुध डेअरी वरचे पत्रे उडून गेल्याने नुकसान

शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात वादळी वाऱ्यामुळे पांडुरंग कृपा या दुध डेअरीचे पत्रे उडून गेल्याने अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती डेअरीचे मालक शिवाजी वाळुंज यांनी दिली. तसेच दुध डेअरीच्या जवळच असलेल्या विजेच्या खांबावरील तारा तुटून रस्त्यावर पडल्याने विजप्रवाह खंडित झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रविवार (दि 4) रोजी दुपारी तीनच्या सुमारास शिंदोडी सह आसपासच्या परिसरात सोसाट्याचा वारा सुटला त्यामुळे शिवाजी वाळुंज यांच्या पांडुरंग कृपा दुध डेअरीच्या वरचे आणि समोरचे पत्रे या वादळी वाऱ्यामुळे उडून समोरच रस्त्यावर पडले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. हे पत्रे उडून गेल्याने अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच दुध डेअरीच्या शेजारीच असलेल्या विद्युत खांबावरील विजवाहक तारा तुटून खाली पडल्याने विजप्रवाह खंडित झाला.