शिरुर- रामलिंग रोड झाला प्रकाशमय…

शिरूर तालुका

उद्योजक प्रकाश धारीवालांनी स्वखर्चाने रामलिंग रोडवर बसवल्या ९० स्ट्रीट लाईट 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरापासून रामलिंग मंदीरापर्यत शिरूर -रामलिंग रोडवर दुतर्फा प्रसिद्ध उदयोजक प्रकाश धारीवाल यांनी स्वखर्चाने तब्बल ९० मोठे स्ट्रीट लाईट्स दिवे बसवले आहे.

महाशिवरात्री निमित्त रामलिंग (ता. शिरूर) येथे यात्रेचे आयोजन असते. महाशिवरात्रीच्या दिवशी रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी येथे येत असतात. शिरूर ग्रामीणचे आदर्श सरपंच अरुण घावटे, शिरूर ग्रामीणचे पहिले लोकनियुक्त सरपंच विठ्ठल घावटे यांच्या पाठपुराव्यानंतर जगप्रसिध्द उद्योजक प्रकाश धारीवाल यांनी रामलिंग रोड प्रकाशमय होण्यासाठी स्वखर्चातून रस्त्याच्या दुतर्फा ९० स्ट्रीटलाईटस् बसवल्याने रामलिंग रोड परिसर आता प्रकाशाने न्हावून निघाला आहे.

प्रकाश धारीवाल यांनी स्वखर्चातून तातडीने स्ट्रीट लाईटस् बसवून दिल्याने शिरुर ग्रामीणच्या सरपंच स्वातीताई विठ्ठल घावटे, विठ्ठल घावटे, अरुण घावटे यांनी प्रकाशभाऊंचे आभार मानले आहेत. यात्रेपूर्वीचं हा रस्ता प्रकाशमय झाल्याने गावकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. तर या रस्त्यावर यापूर्वी अंधार असल्याने रात्रीच्या वेळी या रस्त्याने जाणे-येणेही धोकादायक झाले होते. हा पालखीमार्ग असल्याने यंदा पालखी भक्तांनाही या मार्गावरुन जाणे सुखकर होणार आहे.