शिरुर तालुक्यातील ज्येष्ठांनी केला नर्मदा परीक्रमा…

शिरूर तालुका

एकशे नऊ दिवसात केला तीन हजार पाचशे किलोमीटर प्रवास

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) सह शिरुर तालुक्यातील तीन ज्येष्ठ व्यक्तींनी एकत्र येत संस्कृतीचा भाग म्हणून नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प करुन एकशे नऊ दिवसात केला तीन हजार पाचशे किलोमीटर प्रवास करत इतिहास रचला असल्याने शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीने सदर ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बाळासाहेब नामदेव भुजबळ तसेच पाबळ येथील एकनाथ शंकर आगरकर व आण्णा नारायण झोडगे या तिघांनी एकत्र येत नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प करत ५ नोव्हेंबर २०२२ रोजी ओंकारेश्वर येथून नर्मदा नदीचे दर्शन घेत त्यांच्या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली त्यांनतर त्यांनी नदीचे कडेने पायी आपला प्रवास सुरु करत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड असा प्रवास करत काही भाग समुद्री मार्गाने जाऊन तब्बल 109 दिवसात २१ फेब्रुवारी २०२३ रोजी 3 हजार 500 किलोमीटर प्रवास करुन इतिहास रचत त्यांचा नर्मदा परिक्रमा पूर्ण केला.

ते आपल्या मायभूमी परतताच शिक्रापूरहे सरपंच रमेश गडदे, माजी उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य पूजा भुजबळ, माजी सरपंच चंद्रकला भुजबळ, व्यापारी असोशियनचे अध्यक्ष अशोक शहाणे, समता परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते संतोष काळे, बाळासाहेब मांढरे यांच्या हस्ते बाळासाहेब भुजबळ, एकनाथ आगरकर व आण्णा झोडगे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना ज्येष्ठ नागरिकांनी केलेला 3 हजार 500 किलोमीटरचा पायी प्रवास व त्यांचा नर्मदा परिक्रमा हा युवकांना प्रेरणा देणार असल्याचे मत सरपंच रमेश गडदे यांनी व्यक्त केले यावेळी सोमनाथ भुजबळ यांनी सर्वांचे आभार मानले.