समाजात अंध अपंगांना नागरिकांनी मदतीचा हात द्यावा

शिरूर तालुका

ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे राजेंद्र सात्रस यांचे नागरिकांना आवाहन

शिक्रापूर (शेरखान शेख): अंध अपंग व्यक्ती समाजात वावरत असताना त्यांना नागरिकांनी मदतीचा हात देणे गरजेचे असून प्रत्येकाने अंध अपंग व्यक्तींना नागरिकांनी मदत करणे गरजेचे असून पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांची कामे गांभीर्याने करावी, असे आवाहन पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र सात्रस यांनी केले आहे.

उरळगाव (ता. शिरुर) येथील रहिवाशी असलेले आदर्श ग्रामविकास अधिकारी पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र सात्रस हे प्रवास करत असताना प्रत्येक ठिकाणी अंध अपंग व्यक्तींना आपल्या वाहनातून त्यांच्या प्रवासाच्या ठिकाण पर्यंत मदतीचा हात देण्याचे कार्य करत असून नुकतेच त्यांनी शिरुर तालुक्यातील एका अंध व्यक्तीला आपल्या वाहनातून मदत करत असताना त्यांनी सदर व्यक्तीशी संवाद साधत असताना सोशल मीडियातून नागरिकांना आवाहन केले आहे.

महाराष्ट्रात असलेले अंध, अपंग व्यक्ती प्रतिकूल परिस्थिती मध्ये काम करत त्यांची कला जोपासण्याचे काम करत असतात. शासनाकडून ग्रामपंचायत मध्ये पाच टक्के निधी अपंग कल्याणासाठी राखीव असताना प्रत्येक ग्रामपंचायतीने दिव्यांग व्यक्तींची कामे सहानुभूतीने व गांभीर्याने करा, असे आवाहन देखील पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र सात्रस यांनी सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना केले आहे.