सेवाधाम मतिमंद विद्यालयात रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील सर्व विशेष विद्यार्थी व कर्मचारी यांची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर नुकतेच संपन्न झाले आहे.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय येथे कोरेगाव भिमा येथील ग्रेस पॅथ लॅब यांच्या वतीने सेवाधाम मधील विशेष विद्यार्थी व तेथे कार्य करणारे कार्यरत कर्मचारी यांच्या साठी रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी ग्रेस पॅथ लॅबचे डॉ. स्वाती सुराणा, कपिल सुराणा, आकाश वाजे, फाल्गुनी संचेती, तेजस्विनी शेळके, सत्यम सोनवणे यांनी सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची तपासणी केली, याप्रसंगी बोलताना विशेष मुलांच्या हिमोग्लोबिन तपासणी करणे गरजेचे असून अशा शिबीराचे आयोजन गरजेचे असल्याचे मत सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी व्यक्त केले.

विशेष विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची रक्त तपासणी करायची असल्यास आम्ही नेहमी तत्पर असल्याचे ग्रेस पॅथ लॅबचे डॉ. कपिल सुराणा यांनी सांगितले. दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नृसिंह कुलकर्णी यांनी केले तर पवन कट्यारमल यांनी सर्वांचे आभार मानले.