करंदीच्या आयव्हिज इंटरनॅशनल स्कूलचा विज्ञान प्रदर्शन उत्साहात

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हिज् इंटरनॅशनल प्रायमरी स्कूल शैक्षणिक संकुलामध्ये नुकतेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले असताना सदर ठिकाणी अनेक बाल वैज्ञानिकांनी सहभाग घेतल्याने विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हिज् इंटरनॅशनल प्रायमरी स्कूल मध्ये नुकतेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी करंदीच्या सरपंच सोनाली ढोकले, उपसरपंच पांडुरंग ढोकले, ग्रामपंचायत सदस्य संदीप ढोकले, मुख्याध्यापिका राणी ढोकले यांसह आदींच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन अतिशय उल्लेखनीय विज्ञान प्रयोग सादर केले. दरम्यान प्रदर्शनात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता, यावेळी मुलांनी सोलार सिस्टिम, कोरोना मॉडेल, वॉटर हार्वेस्टिंग, मॅग्नेटिक इफेक्ट, ऍसिड बेस रिएक्शन, रॉकेट लॉन्चिंग यांसह आदी विषयांवर आपले प्रकल्प सादर केले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनाची पाहणी करताना अशा प्रकल्पांमधून मुलांच्या बुद्धीला खऱ्या दृष्टीने वाव मिळून मुलांची शिक्षणाप्रती आवड वाढीस लागते असे संस्थेचे प्रमुख भास्कर ढोकले यांनी सांगितले. तर सदर प्रदर्शन पाहताना मुलांच्या वैज्ञानिक संकल्पना व आत्मविश्वास पाहण्यास मिळाला असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या, तर शाळेच्या मुख्याध्यापिका राणी ढोकले यांनी सर्वांचे आभार मानले.