जातेगावच्या अविनाश कामठेंची इतिहास विषयात पीएचडी

शिरूर तालुका

जातेगाव बुद्रुक ग्रामस्थांकडून अविनाश कामठेंचा नागरी सन्मान

शिक्रापूर: जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील शेतकरी कुटुंबातील डॉ. अविनाश जयसिंग कामठे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथून इतिहास विषयावरील PHD डॉक्टरेट पदवी प्राप्त केली असल्याने नुकताच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सन्मान करण्यात आला आहे.

जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील शेतकरी कुटुंबातील अविनाश कामठे यांनी परिस्थितीवर मात करत शिक्षण घेतले, शिक्षणातून उच्च पदवी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी नुकतीच नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातून इतिहास विषयावरील पीएचडी डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याने त्यांचा माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली सन्मान करण्यात आला. आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी नव्याने आयपीएस पोलीस अधिकारी झालेले विनायक भोसले यांचा देखील सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप, बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर, प्रकाश पवार, सरपंच किशोर खळदकर, उपसरपंच गणेश उमाप, साहेबराव खळदकर, विशाल उमाप, दत्तात्रय उमाप, बाबू इंगवले, हणमंत पवार, बाबू उमाप, गणेश कामठे यांसह आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बोलताना ग्रामीण भागातील युवक परिस्थितीशी झगडत शिक्षण घेत उच्चपदावर जाऊन आपल्या आई वडिलांच्या नावासह गावांचे नाव उज्वल करत असल्याची बाब आनंददायी असल्याचे मत माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे बी. बी. आर क्षीरसागर यांनी केले, तर ग्रामपंचायत सदस्य नीलेश उमाप यांनी आभार मानले.