आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत १४ विद्यार्थ्यांना घवघवीत यश

शिरूर तालुका

शिक्रापूर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेत मुखईच्या कै. रा. गे. पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयच्या तब्बल १४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाठ यांनी दिली आहे.

मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयच्या आठवीच्या पंधरा विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यापैकी तब्बल १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये काळोखे समृद्धी बाळासाहेब १३५ गुण, पुंड सुजित विष्णू १२८ गुण, जाधव गौरी प्रसाद ११९ गुण, देशमुख अथर्व योगेश ११६ गुण, झगडे महेश कृष्णा, मांडगे सुमित गोरख, शेवाळे प्राजक्ता राजेंद्र १०९ गुण, शिंदे सिद्धी भरत १०० गुण, लवटे स्नेहल दत्तात्रेय ९६ गुण, पाटील सिद्धेश दीपक ९० गुण, दरेकर अक्षद योगेश ८६ गुण, देशमुख वेदांत शिवाजी ७८ गुण, सोनवणे तनवी राजेंद्र ७६ गुण व गायकवाड ओम संतोष ७४ गुण अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी गुण संपादित करत यश मिळवले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अनिता डमरे, पांडुरंग गायकवाड, मनोज धिवर, किशोर गोगावले यांनी मार्गदर्शन केले, तर सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा जयश्री पलांडे, कार्याध्यक्ष अशोकराव पलांडे व सचिव सुरेशराव पलाडे, प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.