माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि बाप्पुसाहेब शिंदे यांच्यामुळे कारेगावकरांना मिळाले रोहीत्र 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व युवासेना जिल्हा प्रमुख बापुसाहेब शिंदे यांच्या माध्यमातून कारेगाव येथील यश ईन चौक परिसरात तात्काळ विद्युत रोहिञ उपलब्ध झाले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्या सोनाली विकास नवले यांनी दिली.

अतिरिक्त भारामुळे येथील विद्युत ट्रान्सफार्मर काही दिवसांपुर्वी जळाला होता. सहा दिवस ऐन उकाड्यात नागरिकांना अंधारात काढावे लागले होते. काही स्थानिक नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करुण विद्युत रोहिञ आणले माञ सदर रोहिञावर अतिरिक्त भार पडून येरे माझ्या मागल्या प्रमाणे पुन्हा अंधारात राहायची वेळ येऊ नये म्हणुन ग्रामपंचायत सदस्या सोनाली विकास नवले, प्रहारचे बापुसाहेब नवले, शरद नवले, दादासाहेब गवारे, भारतकुमार नवले, अविनाश नवले, बंटी नवले, प्रज्योत नवले, अभिजित गवारे, किरण गवारे आंदीनी सदर बाब बापुसाहेब शिंदे यांच्या कानावर घातली. या बाबीची दखल घेत बापुसाहेब शिंदे यांनी माजी खासदार आढळराव पाटील यांच्या माध्यमातून संबंधित अधिका-यांशी संर्पक साधुन फ्युजपेटी सह विद्युत रोहिञ उपलब्ध करुन दिले. या बाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.