अध्यात्म आत्मसात करणे काळाची गरज; समाधान शर्मा

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात व समाजात शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण असून शिक्षक आपल्या अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यामुळे शिक्षका बरोबर विदयार्थांचे वागणे नेहमी आदर युक्त असले पाहीजे तसेच अध्यात्म आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे मत ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले.

केंदूर (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुर संचालित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल येथे नुकतेच ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी विद्यार्थ्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य अनिल साकोरे, संस्थेचे पुणे विभागीय सदस्य राम साकोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्रीहरी पऱ्हाड, दत्ता साकोरे, निलेश साकोरे, दत्ता साकोरे, चंद्रकांत थिटे, महादेव पाटील, नंदू बहिरम, संजय जोहरे, मोतीलाल वागतकर, मनोज दोंड, बाळासो धस, दशरथ सुक्रे, सारीका पाटील, राजु पानमंद, सोमनाथ पिचड, शिवाजी ताथवडे यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यात्मामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळते. शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले गेले आहे. शिक्षणामुळे समाजात शांतीयुक्त क्रांती निर्माण होते. हे परिवर्तन घडत असताना हिंदुस्थानचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा, इतिहास, ज्ञान, परंपरा यांच्या बरोबरीनेच आधुनिक जगातील वैज्ञानिक प्रगती आणि भविष्यकाळाची आव्हाने यांचाही समग्रतेने विचार होण्याची आवश्यकता असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना महापुरुंषांची ओळख करून देत साने गुरुजीयांच्या कथेचा सात दिवसाचा सप्ताह प्रत्येक शाळेत घडला जावा असे देखील समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम साकोरे यांनी केले तर चंदकांत थिटे यांनी आभार मानले.