युरीया खताबाबत मोदी सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय…

महाराष्ट्र

मुंबई: देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. खतांचे अनुदान कमी होऊन खताची उपलब्धता वाढावी, यासाठी सरकारने नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना खत कंपन्यांना दिल्या आहेत. यामुळे शेतकरीऱ्यांचे पैसे वाचतील आणि भारत खताबाबत लवकर स्वयंपूर्ण होऊ शकेल असा सरकारचा दावा आहे. शिवाय सरकारवरीलही अनुदानाचा भार कमी होणार आहे.

नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना

मोदी सरकारने खत कंपन्यांना नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. तसे पत्र खत कंपन्यांच्या सीईओंना पाठवले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वाचून खताबाबत भारत स्वयंपूर्ण होईल..

नॅनो युरियावर केंद्र सरकारला कोणतेही अनुदान द्यावे लागत नाही. शेतकऱ्यांनी नॅनो युरियाचा वापर सुरु केल्यास सरकारवरील अनुदानाचा भार कमी होईल. त्यामुळे खत कंपन्यांनी नॅनो युरियाची विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन सरकारने केले आहे.

असे वाचणार पैसे…!

युरियाच्या गोणीची किंमत सरकारी अनुदानासह 266 रुपये आहे. मात्र, नॅनो युरियामुळे शेतकऱ्यांचे प्रत्येक गोणीमागे 41 रुपये वाचणार आहेत. नॅनो युरियाची अर्ध्या बाटलीची किंमत साधारण 225 रुपये असू शकते, असे सांगण्यात आले.