ऊसाची एकरी संख्या योग्य राखण्यासाठी रोपांची लागवड करा: अविनाश निर्मळ

शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) : एका एकर जमिनीतुन ४० ते ४५ हजाराच ऊस कारखाण्याला जात असल्याने फुटव्यांचे नियंत्रण राखल्यास एकरी ४० ते ४५ हजार फुटवे राखता येतात. तसेच एका ऊसाचे वजन अडीच किलो झाल्यास एकरी सहज शंभर टनापर्यंत मजल मारता येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे अविनाश निर्मळ यांनी सांगितले.

unique international school
unique international school

निर्वी (ता. शिरुर) येथे सुपर केन नर्सरीचा प्रात्यक्षिक कार्यक्रम पार पडला. येथील पोपट सोनवणे यांच्या प्रक्षेत्रात प्रत्यक्ष सुपर केन नर्सरी तयार करण्यात आली होती. रोपे तयार करताना बेणे प्रक्रिया तसेच बेणे निवड चांगली करण्यात आली होती. यावेळी सुपर केन नर्सरीबाबत अविनाश निर्मळ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. कृषी विभागाच्या माध्यमातून सुपर केन नर्सरी स्थापनेला प्रोत्साहन म्हणून ४ हजाराचे अनुदान देण्यात येत असल्याची माहिती कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे यांनी दिली.

या कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक कांतीलाल वीर कृषी सहायक संतोष फलके, रिसोर्स फॉर्मर जयसिंग सोनवणे मोहन सोनवणे, प्रफुल्ल सोनवणे ग्राम कृषी विकास समितीचे सदस्य नंदकुमार सोनवणे, रामभाऊ सोनवणे, मोहन कुल, सुभाष काटे, संजय डोमे, सागर पवार, किरण सोनवणे तसेच परिसरातील शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते. कृषी सहायक जयवंत भगत आणि दत्तात्रय सोनवणे यांनी प्रात्यक्षिक राबविण्यासाठी योगदान दिले. तसेच जयवंत भगत यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सुपर केन नर्सरीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.