शिरुर महिला दक्षता समिती आणि आधारछाया फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) पोलीस बांधव नेहमीच सगळ्यांचे भावाप्रमाणेच रक्षण करत असतात. त्यांना कोणताच सण साजरे करण्यासाठी घरी जायला सुट्टी नसते. तुम्ही सर्वांनी त्यांना राखी बांधून बहिणीची जागा भरुन काढली.तसेच पत्रकार बांधवांनाही राखी बांधून तुम्ही समाजात वेगळा आदर्श निर्माण करत आहात. हे सर्वजण नेहमीच भावाप्रमाणेच तुमच्या सोबत आहेत. प्रत्येक पुरुषाने महिलेचा आदरच केला पाहिजे असे प्रतिपादन शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी केले.

 

रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सन म्हणून ओळखला जातो. शिरुर पोलिस स्टेशन महिला दक्षता समिती आणि आधार छाया फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शिरुर पोलिस ठाण्यातील पोलिस बांधव आणि पत्रकार यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच विश्वकुमारी विद्यालयाच्या – बहनजी यांनीहीआपले मत व्यक्त केले.

 

यावेळी पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि पत्रकार यांना राख्या बांधून हा सण साजरा करण्यात आला. यावेळी महिला दक्षता समितीच्या जिल्हा समन्वयक शोभना पाचंगे, शिरुर महिला दक्षता समिती अध्यक्षा राणी कर्डिले, आधार छाया फाऊंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे, डाॅ वैशाली साखरे, अर्चना गायकवाड, शेख, प्रिती बनसोडे, राणी शिंदे, ज्योती हांडे, वैशाली ठुबे, शीला बाचकर, सीमा शेळके, मोनिका राठोड, छाया पाडळे आदी महिला उपस्थित होत्या.