शिक्रापूरचा विजेचा प्रश्न सोडवत आश्वासनाची पूर्तता

शिरूर तालुका

शिक्रापूर ग्रामस्थांच्या आंदोलनाला विद्युत वितरणकडून यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मुख्य गावामध्ये अनेक दिवसांपासून विजेच्या समस्या असल्याने ग्रामस्थांनी मागील आठवड्यात विद्युत वितरण कार्यालयवर मोर्चा काढला असता अधिकाऱ्यांनी 8 दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असता नुकतेच विद्युत वितरणकडून शिक्रापूर गावासाठी नवीन अतिरिक्त विद्युत रोहित्र देण्यात आल्याने ग्रामस्थांच्या मागणीला यश आले असून विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांनी देखील आश्वासनाची पूर्तता केल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक व महिला हैराण झालेले असताना ग्रामस्थ व महिलांनी विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चा काढत विजेच्या समस्या सोडवण्याची मागणी केली होती. यावेळी विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी 8 दिवसात सदर समस्या सोडवण्याचे आश्वासन दिलेले असता नुकतेच नव्याने विद्युत रोहित्र गावात बसवण्यात आले.

यावेळी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच मयूर करंजे, माजी उपसरपंच रमेश थोरात, सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्या मोहिनी मांढरे, माजी सदस्या मिना सोंडे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, निवृत्त पोलीस अधिकारी अरुण सोंडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक शहाणे, समता परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, प्रकाश सोंडे, निलेश उबाळे यांसह आदी उपस्थित होते, तर शिक्रापूर मधील विजेच्या समस्येबाबत ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाची विद्युत वितरण विभागाने दखल घेत समस्य्या सोडवल्याने ग्रामस्थांनी विद्युत वितरण विभागाने आभार मानले.