sambhajiraje vidyalay

श्री संभाजीराजे विद्यालयाच्या २७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती…

शिरूर तालुका

शिक्रापूर: जातेगांव बु॥ (ता. शिरूर) येथील श्री संभाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या २७ विद्यार्थ्यांनी एनएमएमएस व सारथी परीक्षेत उत्तुंग यश संपादन करत शिष्यवृत्ती प्राप्त होण्याचा सन्मान मिळविला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पातळीवरील एनएमएमएस परीक्षा व महाराष्ट्रातील छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे,’ अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली.

एनएमएमएस परीक्षेत प्रत्येकी ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणाऱ्या ६ विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
१ . तुपे आर्या सचिन १३१
२ . श्रीनाथ सुभाष बगाटे १२१
३ . गायकवाड प्रणव तुकाराम ११७
४. उमाप गौरी नवनाथ ११४
५ . फणसे सार्थक बाळू १०४
६ . मोरताटे समीक्षा इरबजी १०१

तसेच रुपये ३८ हजार ४०० प्रत्येकी सारथी शिष्यवृत्ती मिळणाऱ्या २१ विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
१ . मासळकर प्रणय दत्तात्रेय
२ . मासळकर तनिष्क अतुल
3. इंगवले साक्षी सचिन
४ . नळकांडे आर्यन राजाराम
५ . उमाप यश शहाजी
६ . मासळकर वेदांत हनुमंत
७ . सातपुते विश्वजीत राहुल
८ . भिसे आदित्य प्रभकर
९ . क्षिरसागर श्रावणी उल्हास
१० . उमाप आर्यन मधुकर
११ . खळदकर कृष्णा शरद
१२ . शिवले समीर गोरक्ष
१३ . वारे सार्थक संदीप
१४ . खंडाळे नम्रता सचिन
१५ . मासळकर वेदिका निलेश
१६ . उमाप आयुष मच्छिंद्र
१७ . गंगेकर सृष्टी अश्विन
१८ . मोरे एकनाथ आप्पा
१९ . कोकणे राजवर्धन सुभाष
२० . गैंद आर्यन अमोल
२१ . घाडगे अक्षय संजय

ranjangaon-mutadwar-darshan
ranjangaon-mutadwar-darshan

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक कांतीलाल बाजीराव धुमाळ, शंकर चिमाजी भुजबळ, रमेश निवृत्ती जाधव, अनिता संतोष तांबे, प्रिया सुरेश उमाप, प्राचार्य रामदास थिटे यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष सुगंधराव उमाप, सचिव प्रकाश पवार, मार्गदर्शक कांतीलाल उमाप, सरपंच किशोर खळदकर सर्व संचालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

एनएमएमएस व सारथी शिष्यवृत्ती परीक्षेचा मुख्य उद्देश समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे, त्यानुसार आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखणे हा आहे. सबब या परीक्षांचा स्पर्धा परीक्षा, गुणवत्ता शिष्यवृत्ती म्हणून ध्येय नजरेसमोर ठेवत आधिकाधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी प्रविष्ट व्हावे.
– रामदास थिटे,
कार्याध्यक्ष – शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ.