Shirur Police Station

संस्था अध्यक्षासंह पाच जण अद्यापही फरार; राजकीय दबाव की लक्ष्मी दर्शन?

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील एका बडया शिक्षण संस्थेतील संस्था अध्यक्षासह अन्य पाच जणांवर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते. ते अदयापही फरार असून, पोलिसांनी त्यांना अदयापही गजाआड न केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उमटत असल्याची चर्चा शिरूर शहरात चांगलीच रंगलीच आहे.

कर्मचाऱ्याने सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापक पद मिळवण्यासाठी संस्थेविरोधात याचिका दाखल केल्याने त्याचा वारंवार मानसिक छळ, आर्थिक लाभापासून वंचित ठेवून, दबाव दमदाटी करून कोऱ्या दस्तऐवजावर बळजबरीने सह्या घेऊन सर्वासमक्ष जातीय शिवीगाळ केल्याप्रकरणी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था अध्यक्ष नंदकुमार निकम यांच्यासह संस्था सचिव प्रकाश बोरा, शाळा समिती सदस्य अनिल बोरा, परिवेक्षक कुमारपाल बोरा, वरीष्ठ लिपिक सुभाष पाचकर, सुरज जाधव यांच्यावर अँट्रॉसिटी अंतर्गत रांजणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सगळे आरोपी गुन्हे दाखल झाल्यापासून अदयापही फरार झाले आहे. त्यांना अटक न केल्याने शिरुर शहरात या विषयी जोरदार चर्चा होत आहे.

शिरूर शहरातील नामांकित याच शिक्षण संस्थेच्या ( शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांदमल ताराचंद बोरा) नावाजलेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून पैशाची लुट केली जात असल्याची चर्चा शहरात चांगली रंगली आहे. विद्यार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी की, शहरातील नामांकित महाविद्यालयाच्या खेळाच्या मैदानावर पोलीस भरतीसाठी रनिंग, गोळाफेक, इ सराव करण्यासाठी गोर गरीब कुटुंबातील विद्यार्थी येत असतात. या विद्यार्थींची अडवणूक करून प्रत्येकी ५०० रूपये वसूल करण्याचे आदेश संस्थेच्या बड्या पदाधिका-याने दिले असल्याने तेथील कर्मचारी वसूली करत असून पावतीची मागणी केल्यास उद्यापासून मैदानावर सराव करायचा बंद कर असे सांगितले जाते. यामधून महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पोलीस भरती सराव करत असलेल्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळत नसून अशा प्रकारे महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांची या ना त्या मार्गाने लूट केली जात असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत शिक्षण विभागातील बड्या अधिका-यांना लक्ष्मी दर्शन होत असल्याने यांसारख्या गोष्टींकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा शिरूर शहरात होत आहे.

शिरूरमधील संस्था अध्यक्षासह पाच जण गुन्हा दाखल होताच फरार; पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष…

शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्था अध्यक्षासंह पाच जणांवर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल

शिरुर तालुक्यातील दुचाकी चोर निघाला यवतमाळ जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी

रांजणगाव MIDC परिसरात कोयत्याचा धाक दाखवुन मोबाईल चोरी करणा-या तीन सराईत आरोपींना अटक

शिरूर तालुक्यात बिर्याणीच्या वादातून एकाला कोयत्याने मारहाण तर दुसऱ्याला…