aayushaman-bharat-shirur

शिरूर तालुक्यात आरोग्य केंद्राचे वाजले तीन तेरा…

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील सरकारी आरोग्य केंद्र (दवाखाना) चक्क दिवसाढवळ्या बंद अवस्थेत असून तेथे डॉंक्टर व कर्मचारी हजर नसल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे उपचार घ्यायला येणाऱ्या अनेक रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

सरकार आरोग्य केंद्रावर भरमसाठ खर्च करत असताना दवाखान्यात पगार घेणारे एकही कर्मचारी, अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाही. त्यामुळे प्राथमिक उपचारापासून नागरीकांना वंचित राहावे लागत आहे. कामात कुचराई करणाऱ्या व हजर नसणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून कारवाई करणाऱ्याची मागणी परिसरातील नागरीकांकडून होत आहे.

ग्रामीण भागातील कवठे येमाई येथील हे आरोग्य केंद्र बंद अवस्थेत असल्याने कामावर नसतानाही कर्मचाऱ्यांचे पगार नक्की कोण करत? वरीष्ठ आधिकारी काय करतात याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. दरम्यान, तात्काळ चौकशी करून गैरहजर असणाऱ्यांना नोटीस पाठवून चौकशी केली जाईल, असे तालुका वैदयकीय आरोग्य अधिकारी दामोदर मोरे यांनी सांगितले.

जायफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

काही आरोग्य टिप्स

लेमन टी पिण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे

उभ राहून जेवण करणे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक