ramchandra-gaikwad

‘मयत’ दुःखातील कारागीर हरपला…

शिरूर तालुका

सादलगाव (संपत कारकूड): शिरूर तालुक्यातील सादलगावमध्ये कोणाची मयत होऊ, त्याची बातमी कानी पडताच तत्काळ हा अवलिया काठी टेकवीत-टेकवीत तिथे हजार होई. शव तिरडीवर बांधण्यापासून ते शव स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यापर्यंतची सर्व परंपरिक व रितीरिवाजाप्रमाणे करावयाची कामे पूर्ण करून, दुःखित नातेवाईकांची जबादारी हलकी करत असे. सादलगाव येथील ८२ वर्षीय रामचंद्र दौलती गायकवाड यांचे १७ जानेवारी २०२४ रोजी हृदयविकारच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

गेली चाळीस वर्षांपासून गावामध्ये अनेक मयतांचा साक्षीदार आणि आपल्या हाताने तिरडीची पहिले गाठ मारणारा, तो जशी सांगेल तशी तिरडी बांधून अंत्यसंस्कारचा अत्यंत महत्वाचा भाग पुढे होऊन आपला अनुभव व माहितीप्रमाणे सामाजिक जबाबदारी स्वेच्छेने पार पाडत असे. नातेवाईकांचे दुःख हलके करणारा परंतु दुर्लक्षित आशा या वृद्धाची सामाजिक दखल म्हणून कि काय, या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारला गावातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली.

सामाजिक दायित्व म्हणून गावाने या व्यक्तीच्या कामाच्याप्रति मरनोत्तर का होईना त्यांचा सन्मान करून कामाची उतराई होईल, अशी कामगिरी करण्याची गरज आहे. कारण या कामासाठी आजही समाजात पुढे होऊन असे काम करणाऱ्या व्यक्ती फार कमी आहेत.

Live Video:स्टेजवर हनुमानाची भूमिका करताना प्रभू श्रीरामांच्या चरणी सोडला प्राण…

शिरूर तालुक्यात १७ गावातील पोलिस पाटील निवड; पत्रकाराची मुलगी झाली पाटलीन…

शिरुर तालुक्यात लग्नाच्या मध्यरात्रीच दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम…

शिरूर तालुक्यातील युवकाचा अपघाती मृत्यू…

कै नामदेवराव दिनकरराव फराटे ऊर्फ एनडी दादा काळाच्या पडद्याआड