पुढील आयुष्य समाजकार्यासाठी घालवा : श्रीहरी पावसे

शिरूर तालुका

वरुडेः शिंगाडवाडी शाळेचे आदर्श मुख्याध्यापक दिपक नाथू जगताप वयाची 58 व नोकरीची 30 वर्षे पूर्ण करून 30 जून 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त शाळा शिंगाडवाडी व व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सेवापुर्ती निमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

अध्यक्षीय भाषणात कोंढापुरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीहरी पावसे म्हणाले, ‘श्री. जगताप सर यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. शिष्यवृत्ती प्रज्ञाशोध परीक्षेत अनेक विद्यार्थी घडविले आहेत. येथून पुढे आपला वेळ देव, देश आणि धर्मासाठी खर्च करावा.’

यावेळी श्री. गभाले सर, श्री. गावडे सर, श्री. तिरखुंडे सर, श्री. धुमाळ सर, श्री. लंघे सर, श्री. शेरकर सर, श्री. चातूर सर, श्री. थोरात सर, श्री. खेडकर सर तसेच वरुडे गावचे माजी सरपंच मारुती शिंगाडे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र शिंगाडे, माजी अध्यक्ष संतोष गोरडे, ग्राम पंचायत सदस्य अरविंद शिंगाडे, माजी मुख्याध्यापक मारुती थोरात, आनंदराव थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन सुर्यकांत बढे यांनी केले व अशोक पवार यांनी आभार मानले.

unique international school
unique international school