Gas Cylinder

शिरूर तालुक्यात गॅसचा काळाबाजार; एजन्सीवर कारवाई कधी होणार?

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गॅसचा काळाबाजार करुन घरगुती गॅस टाकीमधून कमर्शिअल टाक्यांमध्ये शिप्ट करणारी मोठी टोळी शिरूर पोलिसांनी गजाआड केली. या टोळीला गॅसपुरवठा करणाऱ्या शिक्रापूर येथील भारत गॅसच्या एजन्सीधारकाला अटक झाली.

शिरूर शहरातील बडया एच.पी गॅस एजन्सीवर अद्याप कारवाई झाली नाही. मोठी आर्थिक तडजोड होऊन कारवाई थंड झाली आहे का? अशी चर्चा शिरूर शहरात जोरदार चालू आहे. एकूणच काय भारत गॅस उपाशी, एच.पी गॅस तुपाशी या पाठीमागचे नेमके गमक काय? हे शोधणे महत्वाचे आहे. शिरूर तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाने अद्याप या एजन्सीवर कुठलीही ठोस कारवाई केलेली दिसून येत नाही.

एच.पी गॅस एजन्सीची तातडीने तपासणी करुन या टाक्या कुठुन व कश्या पुरवल्या. रजिस्टर बुका मध्ये याची नोंद कशी घेतली. याची सखोल चौकशी करून या बडया गॅस एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
(क्रमशः)

unique international school
unique international school