मुखईच्या विद्यालयातील बावीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

शिरूर तालुका

राष्ट्रीय शिष्यवृत्तीस दहा व सारथीसाठी बारा विद्यार्थी लाभार्थी

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेनुजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित केले असून राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत 10 तर सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत 12 विद्यार्थी पात्र ठरलेले असताना यापैकी राष्ट्रीय शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांना 5 वर्षे दरवर्षी 12 हजार तर सारथी शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांना 4 वर्षे दरवर्षी 9 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती मिळणार असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे.

मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेनुजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यातील विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केले असून राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत स्वराज बनसोडे, प्रतिक्षा रुपनर, निकिता बच्छाव, प्रणाली थोरात, प्रिया वाघ, श्रावणी भुजबळ, वेदांत कोळपे, स्मित गुजर, श्रावणी पाटील, प्रेम खलसे या विद्यार्थांनी यश मिळवले आहे.

सर्व विद्यार्थ्यांना 5 वर्षे प्रत्येक 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे तर सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या ऋतू करंजे, साक्षी लोखंडे, आकाश डफळ, रितेश ढगे, अर्जुन गिलबिले, वेदांत गिलबिले, सोहम कामथे, सानिषका दोरगे, विजय गौरमसलगे, विश्वजित सोनवणे, आदिनाथ नलवडे, स्वरांजली थोरात या विद्यार्थ्यांना 4 वर्षे प्रत्येक वर्षी 9 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

सर्व विद्यार्थ्यांना किशोर गोगावले, अनिता डमरे, पांडुरंग गायकवाड, मनोज धिवार यांनी मार्गदर्शन केले असून सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा जयश्री पलांडे, सचिव सुरेश पलांडे, कार्याध्यक्ष अशोक पलांडे व प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी अभिनंदन केले आहे.