शिक्रापूरच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत यश

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कराटे प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या कराटे स्पर्धेत भाग घेत यशस्वी कामगिरी केल्याने सर्व खेळाडूंनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत यश संपादित केले असल्याची माहिती सोमनाथ अभंग यांनी दिली आहे.

ranjangaon-mutadwar-darshan
ranjangaon-mutadwar-darshan

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कराटे प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी प्रशिक्षक सोमनाथ अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली येथे पार पडलेल्या दहाव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी कुमिते प्रकारमध्ये विश्वजीत सासवडे, अद्वैत गवारे, साईरंग काकडे, साची थोरवे, शरद सेन यांनी सुवर्ण पदक तर पूर्वा जकाते, अर्चित फापाळे, कृष्णा गोडसे, विशाल माटोळे, अजिंक्य भंडारे, यशराज कदम, जयदत्त ढेरे यांनी रौप्य पदक आणि शौर्य उमासरे, अयान शेख, पूर्वा निकम यांनी कांस्य पदक पटकावले आहे.

तसेच प्रमाणे काता कराटे प्रकारात सर्व खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक पटकावले आहे, ची कमाई केली. सर्व खेळाडूंना कराटे प्रशिक्षक सोमनाथ अभंग व विजय अघाव यांनी मार्गदर्शन केले. तर यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचे उद्योजक मंगेश सासवडे, जोस्त्ना जकाते, सीताराम चव्हाण यांनी अभिनंदन केले.