इस्पात कंपनीतील पीडित कामगारांना न्याय मिळावा…

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील २२ वर्षापुर्वी टाळेबंदी करुन कंपनीतील ५ हजार कामगारांचे भवितव्य धोक्यात आलेले असताना सध्या कंपनी विक्री केली. मात्र योग्य न्यायासाठी इस्पात कंपनीची गैरव्यवहारांची चौकशी करुन पिडीत कामगारांना न्याय मिळाव, अशा मागणीचे निवेदन कंपनीच्या गेटवर राष्ट्रवादी श्रमशक्ती महासंघाच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.

ranjangaon-mutadwar-darshan
ranjangaon-mutadwar-darshan

सणसवाडी (ता. शिरुर) येथील इस्पात कंपनी २२ वर्षापुर्वी बंद करण्यात आल्याने तब्बल ५ हजार कामगारांचे भवितव्य धोक्यात आलेले असताना त्याबाबत लढा सुरु होता. मात्र सध्या कंपनीचा विक्री केल्याने नुकतीच राष्ट्रवादी श्रमशक्ती महासंघाची बैठक पार पडली.

यावेळी सचिन भंडारे, विक्रम दरेकर, प्रविण दरेकर, उद्योजक नवनाथ हरगुडे, नवनाथ दरेकर, सोसायटीचे संचालक भैरु दरेकर, सुदाम यादव, राष्ट्रवादी श्रमशक्ती महासंघाचे अध्यक्ष रामा वांद्रे, चिटणिस दिलीप देशमुख, प्रकाश पाटील, विजय रणधिर, भगवान सरक, अशोक देवरे, दता म्हस्के, दिलीप म्हस्के, शरद म्हस्के, अण्णाश्री खंडे, संजय विर, नरहरी काळदाते, राजू स्वामी, विजय निंबाळकर, विद्याधर कुंटे, भागवत जगदाळे, विलास पाटील, हेमंत राठोड, शिवाजी साळुंके, भगवान सपकाळ, नामदेव महाजन यांसह आदी कामगार व ग्रामस्थ उपस्थीत होते.

कामगाराच्या न्यायालयीन लढ्यात सुप्रिम कोर्टापर्यंतचे सर्व निकाल कामगारांचे बाजूने लागले . २०१५ ला कामगारांना ६ कोटी देणेचा प्रस्ताव होता मात्र कंपनीने दिवाळखोरी जाहीर करत ४ कोटीही दिले नाही व कंपनीची विक्री २०० कोटीं ऐवजी १०४ दाखवली. त्यात ठराविक रक्कम काही कामगारांना त्यांचे खातेवर बेकायदेशिररित्या पाठवून हिशेब देण्याचा देखावा केला, तो कामगारांना मान्य नाही. त्यामुळे कामगारांचे हित पाहत योग्य न्याय देण्यासाठी कामगारांनी निवेदन देत मागणी केली आहे.

इस्पात कंपनी खरेदीदार कंपनी युरेनस सॉफ्टेक पार्क प्रायवेट लिमिटेडच्या प्रतिनिधींनी यावेळी गेट वर येत निवेदन न स्वीकारल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस हवालदार संदीप कारंडे, अमोल रासकर यांना कामगारांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून यावेळी सणसवाडीच्या सरपंच संगिता हरगुडे व रामदास दरेकर यांनी देखील ग्रामपंचायत कर प्राप्त होण्यासाठी निवेदन दिले आहे. तर सदर निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील पाठवण्यात आले आहे.

सणसवाडी ग्रामपंचायतचे कंपनीचे 7 कोटी ५२ लाख ७७ हजार ९२२ रुपये कर येणे बाकी असून NCLT कोर्टाकडून दिवाळखोरीचे कारण देत 11 हजार रुपये भरुन कर पूर्ण करण्यास सांगितले आहे. मात्र ग्रामपंचायतीची एवढी मोठी आर्थिक हानी सहन करणार नसून याबाबत कायदेशीर मार्गाने जात पुन्हा एकदा याचिका दाखल करत ग्रामपंचायतीचा कर मिळवण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ प्रयत्न करणार असल्याचे रामदासनाना दरेकर यांनी सांगितले.

इस्पात कंपनीतील कामगारांपैकी शंभरहुन अधिक कामगारांचा हालाखी व उपासमारीने मृत्यू झाला आहे. जवळपास २२ वर्षापासून हा संघर्ष चालू असून आम्ही हा चालूच ठेवणार आहे. पुढील काळात ईश्वर आम्हाला लढायला यश देईन, असे राष्ट्रवादी श्रमशक्ती महासंघ चे अध्यक्ष रामा वांद्रे यांनी सांगितले.