शिक्रापूरात बापाने नदीत फेकलेल्या बालिकेचा पोलिसांकडून शोध

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका नराधम इसमाने आपल्या मुलीला नदीच्या पाण्यामध्ये फेकून देत मुलगी बेपत्ता झाल्याबाबत अफवा केली मात्र शिक्रापूर पोलिसांनी सदर प्रकाराचा छडा लावला असताना अद्याप बालिकेचा तपास लागला नसल्याने शिक्रापूर पोलिसांकडून बालिकेचा नदीपात्रात शोध घेण्याचे काम सुरु आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील युवराज सोळुंके या नराधम इसमाने आपल्या 7 वर्षीय अपेक्षा सोळुंके या बालिकेचा वेळ नदीमध्ये फेकून दिले. त्यांनतर मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देखील दिली. मुलीचा शोध पोलीस घेत असताना पोलिसांनी मुलीचा बापानेच पोत्यात टाकून नदीत फेकून देत खून केल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर तातडीने नराधम युवराज सोळुंके रा. बजरंगवाडी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यास अटक देखील केली मात्र सदर बालिकेला फेकून दिलेल्या वेळ नदीला जास्त पाणी आल्याने मृतदेह पुढे वाहून जाण्याची शक्यता आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, शंकर साळुंके, श्रीमंत होनमाने, पोलीस नाईक अमोल दांडगे, भास्कर बुधवंत, लखन शिरसकर यांनी वेळ नदीच्या तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, शिवतक्रार म्हाळुंगी येथील वेळ नदीवरील बंधाऱ्यांवर जात स्थानिक नागरिक व मासेमारी करणाऱ्या नागरिकांकडून बालिकेचा पाण्यात शोध घेतला असून येथील मासेमारी करणाऱ्या नागरिकांना नदीमध्ये संशयास्पद काही आढळून आल्यास तातडीने संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. मात्र अद्याप पर्यंत सदर बालिकेचा मृतदेह पोलिसांना मिळालेला नसून पोलिसांकडून सखोल शोध सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.